एक्स्प्लोर
मंत्रालयाच्या गेटवर 5 हजारांची लाच घेताना उपसचिव अटकेत
मुंबई : गृहखात्याचा उपसचिव संजय खेडेकरला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. पाच हजारांची लाच घेताना एसीबीने खेडेकरला अटक केली.
पोलिस शिपायाची फाईल क्लिअर करण्यासाठी खेडेकरने दहा हजारांची मागणी केली होती. त्यापैकी पाच हजाराची लाच घेताना खेडेकरला सापळा रचून अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे मंत्रालयाच्या गेटवरच संजय खेडेकरला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं त्याला अटक केली. तक्रारदाराच्या मुलाची पोलिस शिपाई म्हणून नियुक्ती करण्यासंबंधी फाईल क्लीअर करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement