एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/07/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/07/2018

एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/07/2018 1. आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाच्या गजरात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा, हिंगोलीच्या जाधव दाम्पत्याला पहिल्या पूजेचा मान, मुख्यमंत्र्यांची 'वर्षा'वर पूजा https://goo.gl/dx5Wv5 2. औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलकाची गोदावरीत उडी, अत्यवस्थ काकासाहेब शिंदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू https://goo.gl/UdwgaM 3. आरक्षण मिळेपर्यंत मेगा भरती रद्द करा, बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाची मागणी, राज्यभरात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन https://goo.gl/K2FT33 4. दरवाढीच्या निमित्ताने पांढऱ्या दुधातील काळे बोके कोण ते शोधा, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोतांचं वक्तव्य, दूध संघाचा तोटा भरुन काढण्यासाठीच दरवाढीची मागणी केल्याचा आरोप https://goo.gl/8GLshw 5. आता सावज दमलंय, भाजपची शिकार स्वतः करणार, खा. संजय राऊत यांना दिलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा https://goo.gl/E9Ld5e 6. राजर्षी शाहू महाराज यांना केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा, कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांची लोकसभेत मागणी https://goo.gl/R6mrHH 7. राफेल डीलप्रकरणी पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्र्यांविरोधात काँग्रेस लोकसभेत हक्कभंगाची नोटीस देणार https://goo.gl/FUa4Fw 8. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांना अटक निश्चित, सुप्रीम कोर्टानेही अटकपूर्व जामीन नाकारला, दहा दिवसात पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश https://goo.gl/bisLLs 9. बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी झोपा काढल्या, खड्ड्यांविरोधात पिंपरीत मनसेचं अनोखं आंदोलन https://goo.gl/8kfuHE 10. ईव्हीएम गुजरातहून सांगलीत, सोशल मीडियावर खोटा मेसेज पसरवणाऱ्यावर गुन्हा, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची कारवाई https://goo.gl/Z3hu4j 11. दिल्लीतील जंतर-मंतर, बोट क्लबवरील आंदोलनांसाठीची बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली, दोन आठवड्यात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे पोलिसांना आदेश https://goo.gl/HMY38W 12. रेल्वेकडून सर्वात मोठ्या नोकरभरतीची तारीख जाहीर, 90 हजार पदांसाठी जम्बो भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षा https://goo.gl/BdBu36 13. नवी मुंबईत खासगी वाहतूकदारांच्या संपाला हिंसक वळण, 12 वाहनांची तोडफोड, चार जण पोलिसांच्या ताब्यात https://goo.gl/qunXK2 14. मुंबईतील लोअर परेलचा रेल्वे ब्रिज धोकादायक, दुरुस्तीपर्यंत ब्रिज बंद राहणार, रेल्वे प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिकेच्या अहवालानंतर निर्णय https://goo.gl/UdMxhc 15. जान्हवी आणि ईशानची प्रमुख भूमिका असलेल्या 'धडक'ची पहिल्या आठवड्यात बक्कळ कमाई, बॉक्स ऑफिसवर 33.67 कोटींचा गल्ला https://goo.gl/J4QdSt BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ब्लॉग, विठ्ठलभक्तीची पाऊसवारी... https://goo.gl/CF8dn4 BLOG : आकाशवाणीच्या वर्धापनदिनानिमित्त एबीपी माझाचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांचा ब्लॉग 'माझे रेडिओ पुराण' https://goo.gl/tvhW6d EXCLUSIVE : संजय राऊत यांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची UNCUT मुलाखत https://goo.gl/6w6ZLT EXCLUSIVE : बिग बॉस मराठीची पहिली विजेती मेघा धाडेची पहिली मुलाखत https://goo.gl/td4pPk मराठा आरक्षण विशेष : ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची खास मुलाखत, पाहा रात्री 8 वाजता माझा विशेष : मराठा गडी असंतोषाचा बळी? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझा’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
आणखी वाचा























