एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/05/2018
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/05/2018
![एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/05/2018 ABP Majha Whatsapp Bulletin 22nd May 2018 एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/05/2018](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/27183835/Whatsapp_Bulletin-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/05/2018
1. मुंबईतील जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचा संप चार दिवसांनंतर मागे, डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि ‘मार्ड’मधील बैठक यशस्वी https://goo.gl/8j1WWV
2. निपाह व्हायरसच्या रुपाने भारतासमोर नवं संकट, केरळमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा, खाली पडलेली फळं खाणं टाळण्याचं आवाहन https://goo.gl/xqxS9C
3. सलग नवव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महागलं, दर कमी करण्यासाठी केंद्राच्या हालचाली, तर श्रीराम फायनान्स आता पेट्रोलसाठीही कर्ज देणार https://goo.gl/6jY1zU
4. लोकशाही धोक्यात, देशासाठी प्रार्थना अभियान सुरु करुया, दिल्ली कॅथलिक चर्चचे आर्चबिशप अनिल कोटो यांचं देशभरातील ख्रिश्चन धर्मगुरुंना पत्र https://goo.gl/StpYvk
5. नांदेडमधील 40 गावांची तेलंगणात सहभागी करण्याची मागणी, गावांमध्ये अद्याप रस्ते नसल्याने गावकरी संतप्त, धर्माबादच्या सरपंच संघटनेकडून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन http://abpmajha.abplive.in/
6. विमान कंपनीच्या चुकीमुळे विमान रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळणार, प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हवाई उड्डाण मंत्रालयाची तयारी https://goo.gl/68rjEE
7. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा, एसीबी कोर्टाकडून क्लीन चिट https://goo.gl/Amu9Gt
8. अमित शाहांच्या घशात राहुल गांधींचा हात, कर्नाटक निवडणूक निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र https://goo.gl/nRdQEE
9. नाशिकमध्ये आसाराम बापूच्या आश्रमाचं अतिक्रमण जमीनदोस्त, मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक कारवाई https://goo.gl/dwHthB
10. भाजी चांगली न झाल्याच्या वादातून बापाकडून मुलाची हत्या, उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील घटना, सूनेच्या तक्रारीनंतर आरोपी शांताराम उज्जैनकरला बेड्या https://goo.gl/vNcgB4
11. व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला, अहमदनगरमधील घटनेनं खळबळ, जखमी तरुणावर पुण्यात उपचार सुरु https://goo.gl/ixbc3S
12. जन्माला आला मुलगा, मिळाली मुलगी, बीडच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, थिटे कुटुंबाची पोलिसांत तक्रार https://goo.gl/KmyJ15
13. केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांची फिटनेस मोहीम, पुशअप्स मारुन ह्रतिक रोशन, विराट कोहली आणि सायना नेहवालला आव्हान https://goo.gl/msEvrS
14. क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या पत्नीला पोलिसाची मारहाण, गुजरातमधील जामनगर येथील घटना, आरोपी पोलिस संजय अहिर निलंबित https://goo.gl/6thdjJ
15. आयपीएलच्या रणांगणात आज फायनलच्या तिकिटासाठी घनघोर संघर्ष, हैदराबाद आणि चेन्नईच्या फौजांमध्ये क्वालिफायर वनची लढाई http://abpmajha.abplive.in/
BLOG : कर्नाटक निवडणूक कव्हर केलेले एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांचा ब्लॉग - राहुलजी, कष्टाला चपळाईची धार द्या! https://goo.gl/8Nvris
माझा विशेष : आर्चबिशप व्होटबँकेचं राजकारण करत आहेत का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर....
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)