एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन
एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 17/11/2017
1. मुंबईतील टोईंगमध्ये मोठा घोटाळा, मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS प्रवीण दराडेंशी लागेबंध, संजय निरुपम यांचा गंभीर आरोप, तर मुख्यमंत्री कार्यालयाने आरोप फेटाळले https://goo.gl/yFF3Kh
2. ऊसदराचं आंदोलन पेटलं, सोलापुरात आंदोलकांनी रक्ताच्या बाटल्या अंगावर फोडल्या, सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या घराबाहेर राडा https://goo.gl/PQzuBc, तर पंढरपुरात प्रवाशांना उतरवून एसटीची तोडफोड https://goo.gl/3Xw3at
3. अमेरिकन एजन्सी ‘मूडीज’ने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं, नोटाबंदीसह जीएसटीचंही कौतुक https://goo.gl/iGtXg1
4. ‘दशक्रिया’ सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, पुरोहितांची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली https://goo.gl/4BhS7T तर औरंगाबादमध्ये 'दशक्रिया' सिनेमावरुन पुरोहित आणि संभाजी ब्रिगेड आमनेसामने https://goo.gl/4b72Td
5. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर पगार कशाला घेता?, हँकॉक पुलाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला झापलं https://goo.gl/yY3Ywd
6. मुंबई ‘मेट्रो-2’च्या कामामुळे आता बीकेसीतील सरकारी कार्यालयात शिफ्टमध्ये काम, सरकारसह कर्मचारी संघटनांकडूनही प्रस्तावाला हिरवा कंदील https://goo.gl/iXXHoM
7. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पाचवा स्मृतीदिन, अभिवादनासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर https://goo.gl/V2TmYf
8. मुंबईसह राज्यात अंड्यांच्या किंमतीत वाढ, बॉयलर अंड्याची किंमत 7 ते 8 रुपयांवर, तर देशी अंडं 11 रुपयांना https://goo.gl/qRQ4Md
9. डी. एस. कुलकर्णींना मुंबई हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा, 23 नोव्हेंबरपर्यंत अटकेला स्थगिती, सुमारे 2,274 ठेवीदारांच्या देणी थकवल्याचा डीएसकेंवर आरोप https://goo.gl/2VsGZo
10. साऊथचा 'द थलायवा' लवकरच मराठी सिनेमात झळकणार, 'पसायदान' सिनेमातून सुपरस्टार रजनीकांत यांचं मराठीत पदार्पण https://goo.gl/FAS9ga
11. नोएडात अज्ञाताचा भाजप नेत्याच्या कारवर अंदाधुंद गोळीबार, स्थानिक भाजप नेते शिवकुमार यांच्यासह तिघांचा मृत्यू https://goo.gl/MRNKPJ
12. गुजरात विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, 70 उमेदवारांच्या यादीत काँग्रेसशी दगाफटका करणाऱ्या 5 जणांना स्थान https://goo.gl/yLwpjM
13. ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये सामील झालेला काश्मीरचा फुटबॉलपटू माजिद इरशाद खानचं आत्मसमर्पण, माजिद सध्या अवंतीपोरातील व्हिक्टर फोर्सच्या ताब्यात https://goo.gl/qzXCLt
14. राजपूतांची तलवार माणसं मोजून डोकी उडवत नाही, ‘पद्मावती’ची तिकीट काढताना विचार करा, फेसबुकवरुन प्रेक्षकांना धमकी https://goo.gl/7Wjj7c
15. कोलकाता कसोटीत पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला, पुजाराच्या झुंजार खेळीमुळे भारताची 5 बाद 74 अशी मजल https://goo.gl/fqp86x
BLOG : एबीपी माझाच्या प्रतिनिधी भारती सहस्रबुद्धे यांचा ब्लॉग - जिभेचे चोचले : पारंपरिक चायनीजचा स्वाद – मेनलॅण्ड चायना https://goo.gl/Lkx7Ya
मूड महाराष्ट्राचा : हिंगोली : तीन वर्षांनंतर औंढा नागनाथमधील जनतेच्या मनात काय? पाहा 'एबीपी माझा'ची महायात्रा, आज संध्याकाळी 7.30 वाजता एबीपी माझावर
जत्रा : इंदापूर (पुणे) तालुक्यातील रुई गावच्या बाबीर देवाची जत्रा, आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर..
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट http://abpmajha.abplive.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement