नवी दिल्ली : ईएनबीए पुरस्कार सोहळ्यात यंदाही एबीपी न्यूज नेटवर्कचा डंका पहायला मिळाला. पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझाच्या 'माझा शिक्षण परिषद' आणि एका बातमीला सर्वोत्तम न्यूज कव्हरेजसाठी सन्मान करण्यात आला आहे. आज दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर एबीपी माझाच्या प्रसन्न जोशी यांना वेस्टर्न रीजन गटात बेस्ट अँकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.


यंदा ईएनबीए पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. एबीपी माझाच्या 'माझा शिक्षण परिषद' या कार्यक्रमाचा करंट अफेअर्समधील (वर्तमानकालीन घडामोडी) सर्वोत्तम कार्यक्रमासाठी ईएनबीए सुवर्ण पुरस्कारानं गौरवण्यात आले. कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार? त्यांच्या भविष्याची दिशा कशी असेल यासाठी तज्ञांना घेऊन या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली होती. या कार्यक्रमामुळे अनेक पालक, विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली.


माझा शिक्षण परिषद ऑनलाईन शिक्षण हा सध्याचा एकमेव पर्याय आहे का?अभ्यासक्रम कमी केल्याने प्रश्न सुटेल?


लॉकडाऊन काळात दृष्टिहीनांची परवड


ईएनबीए पुरस्कार सोहळ्यात एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्या बातमीचा सर्वोत्तम न्यूज कव्हरेजसाठी ईएनबीए सुवर्ण पुरस्कारानं गौरव करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात दृष्टिहीनांची होणारी परवड निलेश बुधावले यांनी बातमीतून मांडला होता.


Lockdown Effect भिक्षा मागून जगणाऱ्या दिव्यांगांचे हाल,वांगणीत 550दिव्यांग कुटुंबांवर उपासमारीची वेळ


ठाणे जिल्ह्यातील जवळपास 20 हजार लोकंवस्ती असणारं वांगणी हे गाव. गावात 550 च्या आसपास अंध बांधवांची घरे आहेत. मुंबईत दिवसभर लोकलमध्ये खेळणी विकून तर कधी भीक मागून हे सर्वजण आपलं पोट भरतात. परंतु, लॉकडाऊन जाहीर झालं आणि सर्व ठप्प झालं. त्यामुळे या अंध बांधवांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. अंध बांधवांपैकी जवळपास 70 टक्के लोकं लोकलमध्ये भीक मागून खातात. तर यातील काहीजण खाजगी कंपनीत कामाला जातात. सध्या लॉकडाऊन आहे. घरात छोटी छोटी मुलं आहेत. सध्या आमचं काम पूर्णपणे बंद असल्यामुळे आमच्यासह या चिमुरड्यांवर उपासमारीची वेळ आलीय. या संदर्भात एबीपी माझावर सविस्तर वृत्त प्रसिद्द करण्यात आलं होतं. 


या बातमीनंतर भाजप आमदार राम कदम यांनी स्वतः वांगणी गावात जाऊन सर्व दिव्यांग बांधवांना महिनाभर पुरेल इतके धान्याचे किट आणि एक वेळचं जेवणं दिलं. तर कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनने आठ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या दोन्ही महिलांची जबाबदारी घेतली. सोबतच 350 अंध बांधवांच्या कुटुंबियांना धान्याचे किट आणि सर्व बांधवांची मेडिकल तपासणी केली. यावेळी सर्वांना मोफत सॅनिटायझर, मास्क, भूक लागण्यासाठी टॉनिक देण्यात आलं. तसेच प्रत्येकाचे शारीरिक तापमान, ऑक्सिजन लेव्हल, साथीच्या आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात आले.