नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2024 साठी भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 51 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये पीएम मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने आपल्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, पहिल्या यादीत मुंबई काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि कधीकाळी भाजपनेच आरोप केलेल्या कृपाशंकर सिंह (Kripashankar Singh) यांना जौनपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.


विशेष म्हणजे याआधी कृपाशंकर सिंह यांचे चिरंजीव माजी आयएएस अधिकारी अभिषेक जौनपूरमधून भाजपच्या तिकीटावर या जागेवरून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा होती. आज भाजपने उमेदवारांची नावे जाहीर करताना त्यांच्या वडिलांचे नाव जाहीर केले. जौनपूर जिल्ह्यातील केराकट तहसीलच्या तिसौरा गावचे रहिवासी असलेले अभिषेक सिंह यांचा राजीनामा अखेर गुरुवारी स्वीकारण्यात आला. अभिषेक यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये राजीनामा दिला होता. ज्याला केंद्र सरकारच्या शिफारशीनंतर राज्य सरकारनेही मान्यता दिली आहे.


विशेष म्हणजे भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेचा उमेदवार घोषित केलेला नाही. नितीन गडकरी यांच्या नावाचाही पहिल्या यादीत समावेश नाही. मात्र, कृपाशंकर सिंह यांच्या रुपाने पहिलं नाव महाराष्ट्रातून आलं आहे. दरम्यान, भाजपची पहिली यादी विनोद तावडे यांनी जाहीर केली. विनोद तावडे यांचे केंद्रीय भाजपमध्ये वजन चांगलंच वाढलं आहे याचीच ही पावती असल्याचे बोलले जात आहे. 



  • कैराना - प्रदीप कुमार

  • मुझफ्फरनगर - संजीवकुमार बालियान

  • रामपूर - घनश्याम लोधी

  • संभल - परमेश्वर लाल सैनी

  • गौतम बुद्ध नगर - महेश शर्मा

  • बुलंदशहर - भोला सिंह

  • हेमा मालिनी - मथुरा 

  • आग्रा - सत्यपाल सिंह बघेल

  • फतेहपूर - राजकुमार चहर

  • एटा - राजू भैया

  • शाहजहानपूर - अरुणकुमार सागर

  • खेरी - अजय मिश्रा टेनी

  • सीतापूर - राजेश सिंह

  • हरदोई - जयप्रकाश रावत

  • अशोक कुमार रावत - मिसरिख

  • उन्नाव - साक्षी महाराज

  • राजनाथ सिंह - लखनौ

  • अमेठी - स्मृती इराणी

  • फर्रुखाबाद - मुकेश राजपूत

  • इटावा - रामशंकर कथेरिया

  • कन्नौज - सुब्रत पाठक

  • जालौन - भानु प्रताप

  • अनुराग शर्मा - झाशी

  • बांदा - आर.के.सिंह 

  • फतेहपूर - साध्वी निरंजन ज्योती

  • लल्लू सिंग - फैजाबाद 

  • आंबेडकर नगर - रितेश पांडे

  • गोंडा - कीर्तवर्धन सिंग

  • डुमरियागंज - जगदंबिका पाल

  • संत कबीर नगर - प्रवीणकुमार निषाद

  • गोरखपूर - रविकिशन शुक्ला

  • लालगंज - नीलम सोनकर

  • आझमगड - दिनेश लाल यादव


इतर महत्वाच्या बातम्या