एक्स्प्लोर
निनावी पोस्टर लावणारे नामर्द : आशिष शेलार
मुंबई: मुंबई बदलण्याऐवजी महाराष्ट्र अखंड ठेवा, अशी पोस्टरबाजी मुंबईत करण्यात आली आहे. पोस्टरवरच्या मजकूराखाली मी मुंबईकर असा उल्लेख आहे. त्यावरुन भाजपानंही जोरदार टीका केली.
हिंमत असेल तर पोस्टरवर नाव का दिलं नाही, म्हणून हे नामर्द माणसाचं कृत्य असल्याचा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.
आशिष शेलार म्हणाले, "नामर्दांना आम्ही विकासाची कामं करून उत्तर देतो, मुंबईचा विकास आधी नागपूरच्याच नितीन गडकरींनी केला आणि आता नागपूरचेच देवेंद्र फडणवीस करत आहेत".
मुंबईचा विकास नागपूरचा माणूस करणार, असं कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरुन आज मुंबईत पोस्टर पाहायला मिळाले.
पोस्टरवर काय म्हटलंय?
नागपूरचा माणूस मुंबई बदलणार : मुख्यमंत्री
त्यापेक्षा नागपूरच्या माणसाने नागपूरसहित अखंड महाराष्ट्र ठेवावा,
मुंबईचाच माणूस समर्थपणे नागपूरसहित अखंड महाराष्ट्र अबाधित ठेवेल.
- मी मुंबईकर
संबंधित बातमी
... तेव्हा मुंबईकर नागपूरच्याच माणसाचं नाव घेतील : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement