एक्स्प्लोर

आरे प्रकरण : विकासकामं म्हटली की, पर्यावरणावर परिणाम होणं अटळ : हायकोर्ट

आरे वसाहतीमध्येच मेट्रोचं कारशेड उभारण्याचा एकच पर्याय उपलब्ध आहे का? कांजुरमार्गमधील 'त्या' पर्यायी जागेबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. असे सुचवत मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला यावर गुरुवारी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : आरे वसाहतीमध्येच मेट्रोचं कारशेड उभारण्याचा एकच पर्याय उपलब्ध आहे का? कांजुरमार्गमधील 'त्या' पर्यायी जागेबद्दलही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. असे सुचवत मुंबई उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला यावर गुरुवारी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच विकासकामं म्हटल्यावर त्याचा कुठेतरी पर्यावरणावर परिणाम होणारच त्यामुळे भारंभार याचिका दाखल करणाऱ्या पर्यावरणवादी याचिकाकर्त्यांची तसेच त्यांच्या वकीलांचीही मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी चांगलीच कानउघडणी केली. आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी मुंबई महापालिकेने 2700 झाडांच्या कटाईची परवानगी एमएमआरसीएलला दिली आहे. याविरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर सध्या मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे. राज्य सरकारनं अद्याप मुंबईतील वन क्षेत्राची संज्ञा निश्‍चित न केल्याबद्दलही हायकोर्टानं आपली नाराजी व्यक्त केली. कांजुरमधील जागेचा पर्याय होऊ शकत नाही, असे आज राज्य सरकारच्या वतीने कोर्टात सांगितलं. सुरुवातीच्या काळातच जर ही जागा तीन महिन्यांत उपलब्ध होत असेल तरच त्याचा कारशेडसाठी उपयोग करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र ही संबंधित जागा अद्याप न्यायप्रविष्ठ असून तांत्रिक कारणांमुळे तिथं कारशेड उभारता येणार नाही, असं उत्तर एमएमआरडीएने कोर्टाला दिलं. मात्र याबाबतची कागदपत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वनक्षेत्राची संज्ञा ठरवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच दिले आहेत. मात्र त्यावरही महाराष्ट्र सरकारने अद्याप कार्यवाही केलेली नाही, याबाबत हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली. 'जर संज्ञाच ठरविली नसेल तर कठीण आहे', असे मत न्यायालयाने व्यक्त केले. याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेतील अनेक मुद्यांबाबतही हायकोर्टाने असमाधान व्यक्त करत भावनिक आवाहनांपेक्षा कायदेशीर मुद्यांवर युक्तिवाद करण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांच्या वकीलांना दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  
मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, दोन जणांना अटक, काही दिवसांपासून इमारत धोकादायक असल्याची माहिती  

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget