Aarey Dairy Mumbai:  भेसळीच्या युगात महाराष्ट्रात तब्बल सात दशक दुध क्षेत्रात विश्वासाची अधिराज्यगाजवणारी डेअरी अर्थात आरे डेअरी.... लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दूध म्हटलं की सगळ्यांच्या ओठावरती आलेल नाव ते म्हणजे आरे डेअरी... स्वस्तात कमी किंमतीत आणि सकस अशी आरे डेअरीची ओळख आहे. मात्र हीच आरे डेअरी आता शेवटच्या घटका मोजतेय. आरे डेअरीच्या नावाने सर्व प्रकल्प सध्या बंद करण्यात आलेत. त्यामुळे आरे नावाने आता दुधाचा थेंब ही बाजारात मिळत नाही.


शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दुधाचा व्यवसाय करावा त्यासाठीशेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या प्रत्येक दुधाच्या थेंबाची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आणि त्याचसंकल्पनेतून आरे डेअरीची निर्मिती झाली. त्यावेळी राज्यकर्त्यांनी ग्रामीण भागाचाच विचार केला नाहीतर  शहरातल्या बेरोजगारांना रोजगार देण्याची संकल्पना होती. म्हणून स्वतंत्र भारताचे पहिलेपंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 3 मार्च 1951 रोजी त्याधुनिक आणि सुसज्ज अशा मुंबईतल्या पहिल्या आरे डेअरीची स्थापना झाली.  


 मुंबईतील आरे डेअरी... तब्बल अडीच लाख लिटर क्षमता असलेल्या या दुग्धशाळेची सुरुवात झाली.  ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडे दुधाचे संकलन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दूधसंकलन केंद्र उभे राहिली. शेतकऱ्यांना दुधातून रोजगार मिळू लागला आणि शहरातील बेरोजगारांच्या हाताला काम आरे  डेअरी देऊ लागली....मुंबईच्या कानाकोपऱ्यात जवळपास एक हजार आठशे आकरा आरे स्टॉल सुरु  करण्यात आले. त्यातून अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ लागला.... मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आणि दुधाचा पुरवठा कमी पडू लागला म्हणून पुन्हाएकदा 25 मे 1963 ला वरळी समुद्रकिनारी दुसरी मोठी साडेचार लाख लिटरची डेरी सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा 1975 ला कुर्ला या ठिकाणी चार लाख लिटरची तिसरी डेरी सुरू करण्यातआली... लाखो लिटर दुधाची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढू लागला आणि शहरातल्या बेरोजगारांना ही मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळू लागला....


 मात्र याच वेळी सहकाराच्या नावाखाली अनेक खाजगी दूध संघ ही उभे राहिले. अनेक राजकीय नेत्यांचे हे दूध संघ असल्याने तिथेच शासकीय आरे डेअरीला उतरती कळा लागायला सुरुवात झाली. 


शेकडो एकरात असलेली आरेची डेअरी....समुद्रकिनारी सोन्याचा भाव असलेल्या ठिकाणी वसलेली वरळी डेअरी आणि प्रशस्त असलेली कुर्ला डेअरीवरच्या भूखंडावर अनेकांच्या नजरा पडायला सुरुवात झाली. सन 2016 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात कुर्ला डेअरी प्रशस्त अत्याधुनिक बांधायची म्हणून डेरी बंद करण्यात आली. मात्र आज तागायात हे काम सुरु ही झालं नाही आणि डेअरी ही सुरु झाली नाही. त्यानंतर ठाकरे सरकार आलं आणि 2021 मध्ये वरळी डेरीच्या जागी मोठं जागतिक दर्जाच मत्स्यलय बांधायचं म्हणून ही डेअरी बंद केली. आतापर्यंत ना मत्सालयचं काम सुरू झालं ना डेरी सुरू झाली. सर्वात आधीची आणि ७० वर्षांचा इतिहास असलेलीही  तिसरी आरे डेअरी.. दुधाचा पुरवठा होत नाही म्हणून आता ती ही पूर्णपणे बंद केलीय. त्यामुळेआरे  डेअरीचा एकही दुधाचा थेंब आता बाजारात नाही....


आरे  डेअरी बंद झाल्यामुळे आता खाजगी दूध उत्पादक संस्थांचेही चांगलेच फावलय... कारण आताही आरे डेअरीच दूध चाळीस रुपये प्रति लिटर मिळायचं आणि तेच दूध खाजगी संस्था 54 रुपयांनी विक्री करत असे. म्हणजेच एक लिटर दुधाच्या मागे दररोज गोरगरीब जनतेचे जवळपास चौदा रुपयांची बचत व्हायची आणि खात्री लायक सकस आरे दुध मिळायच....