मुंबई : मेट्रो 7 प्रकल्पासाठी 'आरे'  कॉलनीमधील सुमारे 5 एकर जागा MMRDA कडे हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारचे हस्तांतरणाचे आदेश दिले आहेत. मेट्रो 7 प्रकल्प अंधेरी ते दहिसर असा प्रस्तावित आहे. मेट्रो 7 प्रकल्पाचे रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड, लेबर कँपसाठी आरे कॉलनीतील जागेचा वापर होणार आहे.


गोरेगावमधील आरे येथील दुग्ध वसाहतीतील जमीन महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. या जागेत अन्य महत्त्वाच्या इमारतींसह मेट्रो भवनही उभारलं जाणार आहे.

मागच्या आठवड्यात मेट्रो कार शेडसाठी आरे मधील जागेचं आरक्षण बदलण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीतला प्रस्ताव  शिवसेनेनं धुडकावला होता. त्याला पुन्हा शह देत आरेमध्ये मेट्रो प्रकल्पाला परवानगी फडणवीस सरकारनं परवानगी दिली आहे.

मुंबईत ‘मेट्रो-7’चं काम सुरु, अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व दरम्यान धावणार मेट्रो


मेट्रो 7 प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :

  • मेट्रो 7 प्रकल्प 5 किमी लांबीचा असून, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर मेट्रो धावेल



  • 16 स्थानकांचे बांधकाम 3 टप्प्यांमध्ये होईल



  • तीन कंत्राटदार मिळून 16 स्थानकांचे बांधकाम करतील



  • 5 किमी लांबीचा उन्नत मार्ग 30 महिन्यांत बांधून पूर्ण करणार


 

या तीन कंपन्या मेट्रो 7 चं बांधकाम करणार :

  • पहिल्या टप्प्यात अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद आणि नवे अशोक नगर या पाच स्थानंकांचे बांधकाम करण्यासाठी मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेडची शिफारस



  • आरे, दिंडोशी, पठाणवाडी, पुष्पापार्क, बाणडोंगरी, महिंद्रा अँन्ड महिंद्रा या दुसऱ्या टप्प्यातील 6 स्थानंकांच्या बांधकामासाठी मे. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमीटेडची शिफारस



  • मागाठाणे, देवीपाडा, नॅशनलपार्क, ओवरी पाडी, दहिसर पूर्व या 5 स्थानकांच्या बांधकामासाठी मे. एन.सी.सी लिमीटेडची शिफारस