एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LIVE : जीएसटी समितीकडून जीएसटीचे दर निश्चित
- नाशिकमधील पिपळगाव येथील पवननगर झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा स्फोट, दोन जणांचा मृत्यू
- जीएसटी समितीकडून जीएसटीचे दर निश्चित, किमान 5 आणि कमाल 28 टक्के जीएसटी दर असणार, अन्नधान्यावर मात्र कोणताही कर नसणार
मुंबई : कुर्ला कारशेडमध्ये आजपासून एसी लोकलची तांत्रिक चाचणी, पुढील दोन आठवडे चाचणी सुरु राहणार, एसी, दरवाजे आणि इतर यंत्रणेची तपासणी होणार
पुणे : सिंहगड रोड परिसरात 55 वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, दोघं पोलिसांच्या ताब्यात, तिघांचा शोध सुरु
हेडलाईन्स :
1. औरंगाबादेत सॅमसंगच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गोदामाला आग, अंदाजे 500 फ्रीज, 500 वॉशिंग मशीन्स जळून खाक
2. नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधातला अविश्वास ठराव फेटाळला, मुख्यमंत्र्यांनी दगा दिल्याचा शिवसेनेचा आरोप, तर राष्ट्रवादीही आक्रमक
3. पेट्रोलपंप चालकांकडून आज पेट्रोल-डिझेलची खरेदी बंद, इंधनाची टंचाई उद्भवण्याची शक्यता, तेल कंपन्यांच्या मनमानीला पंप चालकांचा विरोध
4. ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याची तयारी, चंद्रकांतदादांच्या मध्यस्थीमुळे स्वाभिमानीचं आंदोलन मागे, 5 नोव्हेंबरपर्यंत कारखाने सुरु होणार
5. माजी सैनिकाच्या आत्महत्येनंतर दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा, राहुल गांधी-केजरीवालांची धरपकड, काँग्रेस आणि आपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
6. इंग्लंडविरुद्ध दोन कसोटींसाठी भारतीय संघ जाहीर, इशांतचं पुनरागमन, तर दुखापतग्रस्त रोहितऐवजी हार्दिक पंड्याचा समावेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement