सरकारशी चर्चा झाल्यानंतर नाशिक वगळता व्यापाऱ्यांचा संप मागे, एपीएमसी नियमनमुक्त करण्याची मागणी, आजही शेतकऱ्यांचा भाजीपाला रस्त्यावर
---------------------------------------
महाराष्ट्राला झोडपून काढणारा वरुणराजा अखेर थंडावला, कोल्हापूरच्या पुरात एनडीआरएफच्या जवानांचं बचावकार्य, चंद्रपुरात धरणाचे दरवाजे उघडले
---------------------------------------
मुख्यमंत्री-पंकजा मुंडेंच्या वादात शिवसेनेची उडी, भाजपमधील धुसफुशीला राक्षसराजची उपमा, पंकजा मुंडेंनाही टोले
---------------------------------------
पालिका निवडणुकीआधी एमआयएमला धक्का, महाराष्ट्रातील पक्षाची नोंदणी रद्द, आयकर आणि लेखापरीक्षण सादर करण्यास टाळाटाळ
---------------------------------------
जम्मू-काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांकडून संपात 2 दिवसांची वाढ, अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही संचारबंदी, अमरनाथ यात्राही थांबवली, 35 जणांचा मृत्यू
---------------------------------------
सुदानच्या अंतर्गत युद्धात अडकलेल्या 300 भारतीयांची सुटका करायला भारतीय सरकार सरसावलं, हवाईदलाच्या 'ऑपरशेन संकटमोचन'ला सुरुवात, परराष्ट्रमंत्री व्ही. के. सिंहदेखील सुदानला जाणार
---------------------------------------
उत्तराखंडनंतर अरुणाचल प्रकरणातही भाजप तोंडावर आपटलं, सरकार बरखास्तीचा निर्णय चुकीचा, सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला झापडलं
---------------------------------------
मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणात पहिल्यांदाच कंत्राटदार गजाआड, रेलकॉनच्या दीपन शहाला अटक, अजून 5 कंत्राटदार मात्र मोकाट
---------------------------------------
इंटरनेट सेवेत सुधारणेसाठी ट्रायचं पाऊल, टेलिकॉम वगळता इतर कंपन्यांनाही वायफाय हॉटस्पॉट उभारायची परवानगी देण्याचा ट्रायचा विचार
---------------------------------------
डेव्हिड कॅमरॉननी दिला ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा, ब्रेक्झिटनंतर ब्रिटनला सावरण्याची जबाबदारी थेरेसा मे यांच्या खांद्यावर