अंधेरीतील बनावट चकमकीप्रकरणी हरियाणाच्या दोन पोलिसांना अटक
एबीपी माझा वेब टीम | 13 Jul 2016 05:36 PM (IST)
मुंबई: मुंबईतल्या अंधेरी परिसरातील संदीप गाडोली बनावट एन्काऊंटरप्रकरणी हरियाणाच्या दोन पोलीस शिपायांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम सिंह आणि जितेंद्र यादव अशी या दोन आरोपी पोलिसांची नावं आहेत. या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर केलं असता त्यांना 20 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 7 फेब्रुवारीला अंधेरी एअरपोर्ट परिसरातील मेट्रो हॉटेलमध्ये गुडगाव पोलिसांनी एन्काऊंटर केलं होतं. पण मुंबई पोलिसांनी तपासानंतर हे एन्काऊंटर बनावट असल्याचा अहवाल दिला आहे. तर दुसरीकडे ज्यावेळी एन्काऊंटर झालं त्यावेळी संदीप गाडोलीची मैत्रिण दिव्या पाहुजा हॉटेलमध्ये उपस्थित होती. मात्र, तपासादरम्यान तिनं 5 वेळा वक्तव्य बदललं आहे.