एक्स्प्लोर

कर्ज फेडण्यासाठी लुटला अंडी भरलेला ट्रक

हैद्राबाद येथून अंबरनाथ येथे अंडीने भरलेला ट्रक येत असतांना 18 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अंबरनाथ- बदलापूर रस्त्यावर काही अज्ञात चोरट्यांनी ट्रकसमोर कार आडवी करून ट्रकचालक महंमद नबी शेख व त्यांच्या 17 वर्षीय मुलाला मारहाण करीत दोघांचेही कारमधून अपहरण केले होते. तसेच दोघांनाही मारहाण करून निर्जनस्थळी सोडून दिले होते. त्यानंतर चोरट्यांनी अंडी भरलेला ट्रक पळवून नेला होता.

ठाणे : कर्जबाजारी झाल्याने कर्ज फेडण्यासाठी चक्क अंड्यांनी भरलेला ट्रक लुटण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. लुटारूंनी ट्रकसह सुमारे पाच लाख किमतींची 1 लाख 41 हजार अंड्यांसह 10 लाख 3 हजारांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना 18 नोव्हेंबर रोजी अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर घडली होती. या प्रकरणी अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने या गुन्ह्यात चार आणखी आरोपी असल्याचे सांगितले आहे. या टोळीने लुटलेल्या अंड्यांसह ट्रक आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 14 लाख 12 हजार 766 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. हैद्राबाद येथून अंबरनाथ येथे अंडीने भरलेला ट्रक येत असतांना 18 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अंबरनाथ- बदलापूर रस्त्यावर काही अज्ञात चोरट्यांनी ट्रकसमोर कार आडवी करून ट्रकचालक महंमद नबी शेख व त्यांच्या 17 वर्षीय मुलाला मारहाण करीत दोघांचेही कारमधून अपहरण केले होते. तसेच दोघांनाही मारहाण करून निर्जनस्थळी सोडून दिले होते. त्यानंतर चोरट्यांनी अंडी भरलेला ट्रक पळवून नेला होता. याप्रकरणी ट्रकचालक शेख यांच्या फिर्यादिवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सदर गुन्हा अत्यंत गंभीर असल्याने त्याचा तपास ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटकडे सोपवला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास हाती घेताच तीन वेगवेगळी पथके तयार करून कसून तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान भिवंडी येथील शहादात अन्सारी नामक इसम या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने ट्रक लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरीस गेलेला ट्रक, त्यातील 1 लाख 16 हजार अंडी आणि आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 14 लाख 12 हजार 766 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक केली. या घटनेतील मुख्य आरोपी शहादात व त्याचे साथीदार कर्जबाजारी झाले होते, या कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी सदर ट्रक लुटला होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
Tukaram Mundhe Marathi News: उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस...कोणता मुख्यमंत्री जास्त चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...
ठाकरे, शिंदे, फडणवीस...तिघांपैकी कोणता मुख्यमंत्री चांगला वाटतो?; तुकाराम मुंढे म्हणाले...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget