एक्स्प्लोर
मुंबईतील भुलेश्वरमध्ये चारमजली इमारतीचा भाग कोसळून अपघात

मुंबई : मुंबईच्या भुलेश्वर भागात एका चारमजली इमारतीचा मागील भाग कोसळल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले असून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दक्षिण मुंबईतील अत्यंत जुन्या अशा भुलेश्वर भागात पुरुषोत्तम नावाच्या चारमजली इमारतीचा काही भाग कोसळला. बचावकार्यासाठी फायर ब्रिगेडच्या 5 गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दुसऱ्या मजल्यावर दोन परिवारातील काही सदस्य अडकले आहेत. त्यांना खाली उतरवण्याचं काम सुरु आहे. जखमी झालेल्या तिघांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
इमारतीचा भाग कोसळण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. गेल्याच आठवड्यात सलग दोन रविवार भिवंडीत इमारत कोसळल्याच्या दुर्घटना घडल्या होत्या.

आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement