एक्स्प्लोर
कन्हैयाचे आरोप खोटे, कथित हल्लेखोर मानसचा दावा

कन्हैया कुमारवर हल्ला केल्याचे आरोप धादांत खोटे असल्याचा दावा कथित हल्लेखोर मानस डेका याने केला आहे. आपण विमानात खिडकीत बसलो होतो, त्यावेळी त्याला चुकून हात लागला. मात्र प्रसिद्धी आणि बातमी करण्यासाठी आपल्यावर हल्ला झाल्याचा बनाव कन्हैयाने केला, असं मानसने म्हटलं आहे. कन्हैया पीडित नसून आपणच त्याच्या आरोपांना बळी पडल्याचं मानसने म्हटलं आहे. मानस टीसीएस कंपनीमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. तो आसामला रवाना होणार आहे.
कन्हैयावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा आरोपी कन्हैयाने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. पुन्हा एकदा, यावेळी विमानात एका माणसाने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/kanhaiyajnusu/status/724099734965645312 कन्हैया कुमार शनिवारी मुंबईत आला होता. चेंबूर मधल्या टिळकनगरच्या आदर्श विद्यालयात त्याची सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? असा सवाल विचारत कन्हैया कुमारनं नरेंद्र मोदींवर टीका केली होती.
- कडेकोट पोलिस बंदोबस्तात रस्ते मार्गाने कन्हैया कुमार पुण्याला रवाना
- मुंबईत कन्हैया कुमारवरील हल्ल्यानंतर पुणे विमानतळ परिसरात कडेकोट बंदोबस्त
कन्हैयावर हल्ल्याचा प्रयत्न करणारा आरोपी कन्हैयाने आपल्या ट्विटर अकाऊण्टवरुन आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली. पुन्हा एकदा, यावेळी विमानात एका माणसाने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/kanhaiyajnusu/status/724099734965645312 कन्हैया कुमार शनिवारी मुंबईत आला होता. चेंबूर मधल्या टिळकनगरच्या आदर्श विद्यालयात त्याची सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जग फिरले, पण मराठवाड्यात आले का? मराठवाड्यात असलेल्या तापमानात मोदी राहतील का? असा सवाल विचारत कन्हैया कुमारनं नरेंद्र मोदींवर टीका केली होती. संबंधित बातम्या :
मोदी जग फिरले, पण मराठवाड्यात आले नाहीत : कन्हैया कुमार
आणखी वाचा























