एक्स्प्लोर
मुंबईत युवा क्रिकेटरची तिघांकडून निर्घृण हत्या
राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू होता. तो लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत होता.

मुंबई : भांडुपमध्ये एका तरुण क्रिकेटपटूची तिघांनी हत्या केली. राकेश पवार असं मृत क्रिकेटपटूचं नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे भांडुपमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राकेश महावीर पेट्रोल पंपावर गेला असताना दबा धरुन बसलेल्या तिघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला झाला त्यावेळी त्याच्यासोबत एक तरुणी होती. तर राकेश विवाहित होता आणि त्याला दोन मुलंही होती. राकेश पवार हा एक स्थानिक क्रिकेटपटू होता. तो लहान मुलांना क्रिकेटचं प्रशिक्षण देत होता. पूर्ववैमनस्यातून राकेशची हत्या झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र राकेशच्या हत्येचं नेमकं कारण आणि आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..






















