ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही. अग्निशमनदलाला या आगीची माहिती दुपारी 2 वाजून 16 मिनिटांनी मिळाली.
याच इमारतीत अभिनेत्री दीपिका पदुकोण हीचं घर आणि ऑफिसही असल्याची माहिती मिळते. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचकेचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट तिने 2010 मध्ये 16 कोटी रुपयांत खरेदी केला होता.
दरम्यान, दीपिकाने ट्वीट करुन आपण सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय आगीशी लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचं आवाहनही तिने केलं आहे.
याशिवाय अनेक उद्योजकांची कार्यालयंही या इमारतीत आहे.
फायर ब्रिगेडच्या शिड्या तोकड्या
बो मोंड इमारतीच्या 33 व्या मजल्याला आग लागली असली, तरी फायर ब्रिगेडकडे तेवढ्या उंचीची शिडीच उपलब्ध नाही. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागत आहे.
दरम्यान, या इमारतीतून जवळपास 100 जणांची सुखरुप सुटका केली आहे. 6 फायर इंजिन, 5 जंबो टँकर आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल आहेत.
विझता विझता आग पुन्हा भडकली
मुंबईतील प्रभादेवी परिसराच्या बो मोंड या इमारतीला लागलेली आग विझत आली होती मात्र पाचच मिनिटात ती पुन्हा भडकली. इमारतीच्या 32 आणि 33 व्या मजल्यावर भीषण आग लागली होती. अग्नीशमन दलाच्या १० गाड्या आणि ३ वॉटर टँकरच्या मदतीने ही आग आटोक्यात आली. मात्र वाऱ्यामुळे पुन्हा आग भडकली.
सध्या इथं धुराचं साम्राज्य परसलंय. इमारतीतील 90 लोकांना सुरक्षीतरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. या इमारतीमध्ये बडे उद्योगपती आणि नोकरशाह राहत असल्याची माहिती मिळतेय. मोठ्या इमारतीला ही आग लागली असल्यानं सी लिंकवरुनही ही आग पाहायला मिळत आहे.
सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
संबंधित बातम्या
2776 स्क्वे फूट एरिया, 4 बीएचके, कसा आहे दीपिकाचा भव्य फ्लॅट?