मुंबई: महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. अवघ्या अडीच मिनिटांच्या पत्रकार परिषदेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.


सकाळी साडेआठ वाजता ही पत्रकार परिषद नियोजित होती. मात्र ती सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी सुरु झाली आणि 9.23 पूर्वीच संपली. म्हणजेच अडीच मिनिटांच्या पत्रकार परिषदेसाठी पत्रकारांना जवळपास 50 मिनिटे वाट पाहावी लागली.

राहुल गांधी काय म्हणाले?

“देशातील विरोधीपक्ष हे पंतप्रधान, भाजप आणि आरएससविरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी भावना आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपकडून भारताचे संविधान आणि भारताच्या सर्व संस्थांवर आक्रमण करण्यात येत आहे. सरकार श्रीमंतांची कर्ज माफ करत आहेत.

मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलचे दर 140 डॉलर प्रति बॅरल होत आज तेच दर 70 डॉलर प्रति बॅरल आहेत. म्हणजेच दर कोसळूनही जनतेला त्याचा फायदा होत नाही.

आज दररोज पेट्रोल का महागतंय?  हा पैसा कुठं जातोय? गरिबाचे पैसे घेऊन 15-20 सर्वात श्रीमंताचे खिसे भरले जात आहेत

पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणा अशी आमची मागणी आहे. मात्र पंतप्रधानांना त्यात इंटरेस्ट नाही.

मुंबईवर आक्रमण केलं, नोटबंदी केली, गब्बरसिंह टॅक्स लागू केला. त्यामुळे सर्व देश नाराज आहे. छोटा व्यापारी दु:खी आहे. त्यासाठीच आमची लढाई सुरु आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.

VIDEO: