एक्स्प्लोर
10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात रद्द झाल्यानंतर आता मुंबईत 9 उपायुक्तांच्या बदल्या
मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलिस उप आयुक्तांच्या बदल्या 48 तासाच्या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता 9 पोलीस आयुक्तांच्या बदल्या मुंबईमध्ये करण्यात आलेल्या आहेत.
![10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात रद्द झाल्यानंतर आता मुंबईत 9 उपायुक्तांच्या बदल्या 9 Deputy Commissioners of Police have been transferred in Mumbai 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या 48 तासात रद्द झाल्यानंतर आता मुंबईत 9 उपायुक्तांच्या बदल्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/04/28181553/Mumbai-Police.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच पोलिस उप आयुक्तांच्या बदल्या 48 तासाच्या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र आता 9 पोलीस आयुक्तांच्या बदल्या मुंबईमध्ये करण्यात आलेल्या आहेत. करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये फारसा फरक नसून पोलिस उपायुक्तांच्या आधीच्या बदलीतील 3 अधिकारी वगळता त्यांच्या बदलीचे ठिकाण तेच ठेवण्यात आले आहे.
2 जुलै रोजी मुंबईतील 10 पोलिस उपायुक्तांच्या मुंबई अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या. 48 तासानंतरच या बदल्या रद्द करण्यात आल्या. ज्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. सूत्रांची माहिती होती की, या बदल्या गृहमंत्री व मुख्यमंत्री यांना विश्वासात घेऊन केल्या गेल्या. मात्र शिवसेनेच्या नेत्यांनी या बदल्या करण्याअधी मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेण्यात आल्याचा आरोप केला. शिवसेनेच्या नेत्यांची काही अधिकाऱ्यांच्या नावाला नापसंती होती. जी बदल्यांचे आदेश आल्यानंतर नेत्यांनी मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवून नवीन ऑर्डर काढण्याचे आदेश दिले होते.
आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्याआधी ती फाइल गृहमंत्री व मुख्यमंत्री दोघांकडे जाणं आवश्यक असतं किंवा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेणं आवश्यक असतं, तसं या बदल्या करताना केलं गेलं नाही असाही आरोप शिवसेनेच्या काही नेत्यांनी केला होता.
त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत केलेल्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या होत्या. मात्र आता 9 पोलिस आयुक्तांच्या बदल्यांचा मुहूर्त लाभला असून या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, त्यांची नाव आणि बदलीचे ठिकाण...
1) परमजीत सिंह दहिया आधी झोन 7 मध्ये होते, त्यांची झोन 3 मध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे
2) प्रशांत कदम संरक्षण खात्यात होते, ज्यांना झोन 7 मध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आहे.
3) गणेश शिंदे आधी SB 1 चे उपायुक्त होते ज्यांना पोर्ट झोन मध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आहे.
4) रश्मी करंदीकर यांना पोर्ट झोन मधून सायबर विभागात ट्रान्सफर देण्यात आली
5) शहाजी उमप यांची डिटेक्शन मधून SB 1 मध्ये बदली करण्यात आली आहे.
6) मोहन दहिकर झोन 11 मधून LA ताडदेव ला ट्रान्स्फर करण्यात आली.
7) विशाल ठाकूर यांची सायबर खात्यातून झोन 11 मध्ये बदली करण्यात आली आहे..
8) प्रणय अशोक मुंबई पोलीस ऑपरेशनमधून झोन 5 मध्ये बदली करण्यात आली.
9) नंदकुमार ठाकूर LA तारदेव येथून डिटेक्शन विभागात बदली करण्यात आली.
पोलीस हेडकॉटर 1 मध्ये असलेल्या पोलीस उपायुक्त एन अंबिका यांची बदली झोन 3 मध्ये करण्यात आली होती. मात्र त्यांची बदली या नवीन ऑर्डर मध्ये कुठेही दाखवली गेलेली नसून त्यांना पोलीस हेडकॉटर 1 चाच चार्ज देण्यात आला आहे.
नऊ पोलिस उपायुक्तांची बदलीची ऑर्डर 10 जुलै रोजी काढण्यात आली आणि यांना तात्काळ प्रभावाने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले असून या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या चार्ज घेतलेला आहे. त्यामुळे पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचा वाद निर्माण झाला होता तो आता कुठेतरी शमलेला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)