एक्स्प्लोर

लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!

लॉकडाऊनदरम्यान शहरातून गावाला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी पार्ले-जी बिस्कीटं संजिवनी देणारी ठरली. तर अनेकांनी घरात पार्ले-जीचा साठा करुन ठेवला होता. याचाच परिणाम म्हणून पार्ले-जीची एवढी विक्री झाली की मागील 82 वर्षांचा विक्रम मोडला आहे.

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांमधील कंपन्यांना नुकसान होत असलं तरी पार्ले-जी बिस्किटांची एवढी विक्री झाली आहे की मागील 82 वर्षांचा विक्रम मोडला आहे. केवळ पाच रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शहरातून आपापल्या गावाला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी संजिवनी देणारा ठरला आहे. शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार पार्ले-जी बिस्कीट होतं. काहींनी स्वत: खरेदी करुन खाल्लं तर काहींनी दुसऱ्यांसाठी मदत म्हणून बिस्किटं वाटली. लॉकडाऊनदरम्यान बहुतांश लोकांनी आपल्या घरी पार्ले-जी बिस्किटांचा स्टॉकच करुन ठेवला होता.

आठ दशकांमधील सर्वाधिक विक्री कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जीची विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. पार्ले-जी हे 1938 पासूनच ओळखीचं नाव असून अनेकांचा आवडता ब्रॅण्ड आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीचे आकडे देण्यास नकार दिला. परंतु यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.

पार्ले-जी सामान्यांचं बिस्कीट : मयांक शाह "कंपनीचा एकूण मार्केट शेअर जवळपास पाच टक्क्यांनी वाढला आहे. यापैकी 80 ते 90 टक्के वाढ पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीतून झाली आहे," असं पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयांक शाह म्हणाले. "पार्ले-जी हे सामान्यांचं बिस्कीट आहे, ज्या लोकांना ब्रेड परवडत नाही ते पार्ले-जी खरेदी करु शकतात. कोरोना संकटादरम्यान अनेक राज्य सरकारांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पार्ले-जी बिस्किटांची खरेदी केली," असंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊनमध्ये मजुरांनी 'पार्ले-जी'वर भूक शमवली कोरोना संकटादरम्यान बहुतांश लोकांनी घरात चहासोबत खाण्यासाठी पार्लेजी बिस्किटांची खरेदी केली. तर आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या लोकांनी पायी प्रवास करणाऱ्या मजुरांना वाटण्यासाठीही पार्ले जी बिस्किटांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. यासोबतच कोरोना संकटाच्या काळात शहरातून आपल्या गावाला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांनीही वाटेत पार्ले जी बिस्किटांच्या माध्यमातून आपली, कुटुंबीयांची आणि मुलांची भूक शमवण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय गुड्डे, बॉरबोन, टायगर, मारी, मिल्क बिकीज या बिस्किटांसह पार्ले प्रॉडक्ट्सच्या मोनॅको या बिस्किटाच्या विक्रीतही वाढ पाहायला मिळाली. मागणी वाढल्यामुळे बिस्किट कंपन्यांन्या लॉकडाऊनच्या काळातही मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्युशनची साखळी मजबूत करावी लागली.

महत्त्वाच्या बातम्या

Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांनी सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget