एक्स्प्लोर

कारची चावी न दिल्याने 60 वर्षीय महिलेची हत्या

संजय उर्फ सोनू वर्मा या आरोपीला अटक करण्यात आले आहे. चार महिन्यापूर्वी रीटा यांच्याकडे पत्नीला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी गाडीची मागणी केली होती. आणि ती देण्यास नकार दिल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

वसई : मीरारोड मध्ये एकट्या राहणाऱ्या रीटा रॉड्रीग्ज या 60 वर्षीय महिलेच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. संजय उर्फ सोनू वर्मा या आरोपीला अटक करण्यात आले आहे. चार महिन्यापूर्वी रीटा यांच्याकडे पत्नीला रुग्णालयात घेवून जाण्यासाठी गाडीची मागणी केली होती. आणि ती देण्यास नकार दिल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. संजय उर्फ सोनू वर्माला पोलिसांनी कानपूर मधून अटक केली आहे. संजय हा रेल्वेच्या गाड्यांचे दुरुस्तीच काम करणारा खाजगी कंत्राटदार आहे. मयत रिता या त्यांच्या फ्लॅटमध्ये एकट्याच रहात होत्या. तसेच संजय उर्फ सोनू वर्मा हा देखील पूर्वी त्याच बिल्डींगमध्ये राहत होता. चार महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी त्याने रिटा यांच्याकडे गाडी मागितली होती. त्यावेळी रिटा यांनी त्याला गाडी देण्यास नकार दिला. त्याच कारणावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. याचा राग मनात धरून 4 नोव्हेंबर रोजी संजयने दिवाळी सणानिमित्त पेढे देण्याचा बहाण्याने रिटा यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपीने चाकूने त्यांच्या गळा, हात, पाय आणि पोटावर वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर आरोपीने रिटा यांच्या हातामध्ये असलेल्या सोन्याच्या बांगड्या, गळ्यातील सोन्याची चैन, कानातील सोन्याचे झुमके आणि पर्समध्ये असलेली रोख रक्कम चोरून तेथून मूळ गावी कानपूर, उत्तर प्रदेशला निघून गेला. त्याला पोलिसांनी कानपूरहून अटक केली आहे. रिटा यांचे पती सुमारे सात वर्षा पूर्वी मरण पावले होते. त्या आपल्या घरी एकट्याच रहात होत्या. सप्टेंबर महिन्यात त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाली होती.  येत्या 21 नोव्हेंबर रोजी वयाची साठी साजरी करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन ही केले होते. रविवार दुपारपासून त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. सोमवारी रात्री त्यांच्या मैत्रिणीने इमारतीतील परिचित महिलेला रिटा यांची माहिती घेण्यास सांगितले. ती महिला रखवालदारासह घरी त्यांना पहायला गेली असता रिटा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्यांना दिसल्या. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासल्यावर सीसीटीव्हीमध्ये संजय वर्मा हा संशयास्पद अवस्थेत रीटा यांच्या इमारतीबाहेर असल्याचे दिसून आले होते. त्याच आधारावर पोलिसांनी तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget