एक्स्प्लोर
बाळासाहेबांचा चौथा स्मृतीदिन, आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर रीघ
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज चौथा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेण्यासाठी राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची रीघ लागण्याची शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे निधन 17 नोव्हेंबर 2012 रोजी झालं होतं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी 11 वाजता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतील. तर दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
दरम्यान शिवसेनेकडून शिवाजी पार्कवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष तयारी केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना कार्यकर्ते त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर दाखल होतील.
स्मारक अजूनही रखडलेलंच!
बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवाजी पार्क किंवा त्याच परिसरात त्यांचं स्मारक करण्याची घोषणा झाली होती. मात्र अखेर महापौर बंगल्याच्या ठिकाणीच स्मारक बनवण्याचं निश्चित झालं. पण प्रत्यक्षात अजूनही कार सुरु झालेलं नाही. त्यामुळे स्मारक कधी होणार असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement