एक्स्प्लोर

वसईत मिठागरातील वस्तीत पाणी साचून 400 रहिवासी अडकले

सलग चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे वसईत मिठागरातील वस्तीत पाणी साचून 400 रहिवासी अडकले आहेत

वसई : वसई पूर्व भागात असलेल्या मिठागरातील वस्तीमध्ये 400 जण अडकून पडले आहेत. वस्तीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सर्वांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. वस्तीत अडकलेल्या रहिवाशांना होड्यांचा आधारे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आपलं घर सोडून येण्याची त्यांची तयारी नसल्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. सलग चार दिवस कोसळणाऱ्या पावसामुळे पहाटे चार वाजल्यापासून रहिवाशांच्या घरात पाणी शिरु लागलं. सकाळपर्यंत कोणतीही यंत्रणा वस्तीपर्यंत पोहचली नाही. 'एबीपी माझा'ने बातमी दाखवल्यावर आपत्कालीन यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी आणि तहसीलदार यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. घरात चोरी होण्याची भीती असल्यामुळे रहिवासी घर सोडण्यास तयार नाहीत. रहिवाशांच्या भूमिकेमुळे बचावकार्य कसं करायचं, हा प्रश्न आता प्रशासनाला पडला आहे. रहिवाशांना घरात अन्न पुरवण्यात येत आहे. वसई स्टेशनपासून दीड किलोमीटर अंतरावर अंबाडी पुलाच्या आतून जाणाऱ्या मिठागराच्या जमिनीत ही वस्ती आहे. गेल्या पन्नास वर्षापासून मिठागरात काम करणाऱ्या कामगारांची ही वस्ती तयार झाली होती. आता दीडशे कुटुंबं या वस्तीत राहतात.

महत्त्वाच्या बातम्या

पायाखालची वाळू सरकलेल्या लोकांकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, मी शिवसेनेसोबतच ठाम, सुनिल शिंदेंचं स्पष्टीकरण

श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

Embed widget