मुंबई : दरवर्षी नाताळ तसेच सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात व गोव्यात हजारो पर्यटक जात असतात. मात्र, यंदा या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. कोकण रेल्वेवर 27 डिसेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे जवळपास 10 गाड्यांना थांबविण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोकण रेल्वेच्या आडवली रेल्वे स्थानकावर लूप लाइनचे काम केले जाणार आहे. त्यामुळे येत्या शुक्रवारी 27 डिसेंबर मध्यरात्रीपासून निवसर ते विलवडे स्थानकांच्या दरम्यान 28 डिसेंबर पहाटेपर्यंत आठ तास वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गावर धावणाऱ्या 10 गाड्यांच्या वाहतुकीवर मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.
हेही वाचा - 'जुगार' ऑन व्हिल!, लोकलमधील 'खेळा'मागची कथा...
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या सुट्टीसाठी पर्टनाला येणाऱ्या पर्यटकांना फटका बसण्याची शक्यता आहे. नाताळच्या सुट्टीसाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या मेगाब्लॅकमुळे काही रेल्वे गाड्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही गाड्या आठ तासांच्या वेळेत थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
हेही वाचा - मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या गाडीला अपघात, पुलावरून थेट रेल्वे रूळांवर कोसळली गाडी
12133 मुंबई-मंगलुरू एक्स्प्रेस,
16335 गांधीधाम-नागरकॉइल एक्स्प्रेस,
22659 कोचुवेली-डेहराडून एक्स्प्रेस,
10111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव
11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस,
12617 एर्नाकुलम-हजरत निजामुद्दिन मंगला एक्स्प्रेस,
11099 एलटीटी-मडगाव डबलडेकर,
19331 कोचुवेली-इंदूर एक्स्प्रेस,
50102 मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर
50101 रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर
या दहा गाड्या ठिकठिकाणी थांबवून ठेवल्या जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - मस्करीत तोंडात सुतळी बॉम्ब धरुन पेटवला आणि तो फुटला...
नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण व गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी!
सदाशिव लाड, एबीपी माझा
Updated at:
23 Dec 2019 03:15 PM (IST)
कोकण रेल्वे मार्गावर 27 व 28 डिसेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -