खदिर इनामदार हा मनसे आमदार राजू पाटील यांचा चालक त्यांच्या नातेवाईकांना डोंबिवलीला सोडून पुन्हा पलवासिटीकडे येत होता. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून थेट गाडी दिवा पनवेल रुळावर कोसळली. सुदैवाने याच वेळी कोणतीही रेल्वे रुळावरून ये जा करीत नव्हती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलीस, लोहमार्ग पोलीस, आरपीएफ आणि रेल्वे चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी क्रेन च्या सहाय्याने ही गाडी काढून घेतली आणि काही काळ बंद असलेला दिवा पनवेल लोहमार्ग पुन्हा सुरू करण्यात आला. अपघात झाल्यानंतर दिवा-पनेवल रेल्वे मार्गावरील वाहतूकही थांबवण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रूळ तपासल्यानंतर ही वाहतूक पुन्हा सुरू केली.
दरम्यान, प्रमोद पाटील यांना राजू पाटील या नावाने ओळखले जाते. यंदाच्या वर्षी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणूकांमध्ये कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजू पाटील निवडणूक लढवली होती. त्यावेळी माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा पराभव करून त्यांनी विजय मिळवला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार निवडणून आले होते.
पाहा व्हिडीओ : वाहतूक कोंडीबाबत मनसे आमदार राजू पाटलांकडून मनपा आयुक्तांची भेट