मुंबई : कोरोनाच्या संकटकाळानंतर आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतंय. राज्यातील अनेक शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, आपल्या पाल्याचा प्रवेश घेताना अनधिकृत शाळा ओळखण्याचं पालकांपुढं आव्हान आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचा मुंबईतील शाळेत प्रवेश घेत असताना अनधिकृत शाळा ओळखा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून (mumbai municipal corporation ) करण्यात आले आहे.  


आपल्या पाल्याला अनधिकृत शाळेत प्रवेश घेत नाहीये ना ? याची खातरजमा करा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. कारण मुंबई महापालिका क्षेत्रात 269 शाळा अनधिकृत असल्याचं समोर आलंय. या अनधिकृत शाळांची यादी मुंबई महापालिकेने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. याबरोबरच अशा अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.


मुंबईतील 269 अनधिकृत शाळांवर बंदी घालण्यासह, या शाळांना आर्थिक दंड अकारण्यात येणार आहे. याबरोबरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. सर्व अनधिकृत शाळांची यादी शासनाकडे मुंबई महापालिका शिक्षण विभागाने पाठवली असून त्यानुसार दंडाची कारवाई  केली जाणार आहे. 


मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या यादीमधील अनधिकृत शाळांध्ये आधीपासूनच मुले शिकत असतील तर त्यांची काळजी घेण्याचे काम शिक्षण उपसंचालकांचे असणार आहे. या शाळांना अंतिम मान्यता मिळाली नसून अनेक शाळांची कागद पत्रांची पूर्तता झालेली नाही. अशा शाळांबद्दल वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन या संदर्भात मुंबई महापालिकेरडून जनजागृती करण्यात येत आहे. 


दरम्यान, भाजप नेते नितेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी  या अनधिकृत शाळांचं नेमकं काय करणार? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता या अनधिकृत शाळांची यादीच मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आली आहे. 


मुंबई महानगरपालिकेडून अनेक वेळा नोटीस
दरम्यान, या अनधिकृत शाळांना मुंबई महानगरपालिकेने अनेकवेळा नोटीस देखील पाठवली आहे. परंतु, या नोटीसींना शाळांनी केराची टोपली दाखवलीय. मुंबईत नवीन शाळा सुरू करण्याआधी मुंबई महानगरपालिकेची मान्यता घ्यावी लागले. परंतु, मुंबईतील तब्बल 269 शाळांनी पालिकेची परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे अशा शाळांकडून पालकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांमधून होत आहे. 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI