BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आज आरक्षण सोडत जाहीर केली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेसच्या दिग्गज नगरसेवकांना आता दुसऱ्या वॉर्डमधून निवडणुकीची संधी शोधावी लागणार आहे. शिवसेना नगरसेवक अमेय घोले, मंगेश सातमकर, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. काही वॉर्डमधील आरक्षणामुळे ही काही विद्यमान नगरसेवकांना पर्याय शोधावा लागणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 60, 85, 107, 119, 139, 153, 157, 162, 165, 190, 194, 204, 208, 215 आणि 221 हे प्रभाग अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यापैकी अनुसुचित जातीतील महिला गटांसाठी 139, 190,194, 165, 107, 85, 119, 204 हे प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.
कोणत्या दिग्गजांना शोधावा लागणार पर्याय
आधीच ईडी आणि आयकरच्या रडारवर असलेल्या माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा वॉर्ड सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे यशवंत जाधवांना शेजारच्या भायखळा- काळाचौकी परिसरातल्या अनुसुचित जातीसाठी आरक्षित असलेल्या वॉर्ड क्रमांक 215 मधून निवडणूक लढता येईल.. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ प्रभाग देखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे आणखी एक दिग्गज असलेले बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमेय घोले यांचा वॉर्डही आरक्षित झाला आहे. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा वॉर्ड क्रमांक 182 हा महिला आरक्षित झाला आहे. रवी राजांनाही आजुबाजूच्या वॉर्ड मध्ये शोधाशोध करावी लागणार आहे. मात्र, प्रभाग पुनर्रचनेमुळे सुरक्षित वॉर्ड मिळणं मुश्कील आहे.
मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांचा वॉर्ड आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव झाला आहे.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग वॉर्ड क्रमांक 206 हा सर्वसाधारण गटासाठी निश्चित करण्यात आला आहे.
महिलांसाठी 53 वॉर्ड आरक्षित
प्राधान्यक्रम 1 (53 )प्रभाग क्रमांक- 2, 10, 21, 23, 23, 25, 33, 34, 49, 52, 54, 57, 59, 61, 86, 90, 95, 98, 100, 104, 106, 109, 111, 118, 121, 122, 134, 144, 145, 150, 156, 159, 169, 170, 171, 172, 175, 178, 182, 184, 189, 191, 192, 201, 202, 205, 207, 212, 213, 218, 229, 230 आणि 236
प्राधान्य क्रम २ (33) प्रभाग क्रमांक- 5, 28, 29, 39, 45, 46, 64, 67, 69, 74, 80, 92, 103, 120, 125, 131, 142, 147, 151, 163, 168, 177, 181, 186, 187, 196, 220, 225, 226, 227, 231, 233 आणि 234
सर्वसाधारण महीला आरक्षित (23) प्रभाग क्रमांक -44, 102, 79, 11, 50, 154, 155, 75, 160, 81, 88, 99, 137, 217, 146, 188, 148, 96 , 9, 185, 130, 232, 53