मुंबई : मुंबईवर 26 नोव्हेंबर 2011 मध्ये (26/11 terror attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपी तहव्वूर राणाविरोधात (Tahhavur Rana) आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Mumbai Police Crime Branch) 405 पानी आरोपपत्र राणाविरोधात दाखल केले आहे. अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या राणाचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण केले जाण्याची शक्यता आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला प्रकरणी हे पाचवे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
कॅनडाचे नागरिकत्व असलेला राणा हा सध्या अमेरिकेच्या तुरुंगात आहे. एका पत्रकाराच्या हत्येचा आरोप त्याच्यावर आहे. मे महिन्यात तहव्वूरचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन न्यायालयाने मंजुरी दिली होती. मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचण्यात तहव्वूरचा राणाचाही सहभाग असल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडलीचाही कट रचण्यात समावेश होता. राणा आणि मिस्टर सेंडस हे शिकागो येथे एमिग्रेट लॉ सेंटर चालवत होते. राणाने डेव्हिड हेडलीच्या मदतीने मुंबईत एमिग्रेट लॉ सेंटरचे ऑफिस उघडले होते. त्या निमित्ताने डेव्हिड हेडली हल्ला करण्याच्या आधी मुंबईत आला. मुंबईत ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करायचा आहे, त्या ठिकाणांचे त्याने फोटो काढले. ते फोटो घेऊन हेडली हा शिकागोला परतला होता. त्यानंतर त्याने मुंबईतील हे फोटो लष्कर-ए-तोयबाच्या कमांडर्सना दिले. अशी खळबळजनक साक्ष डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिली होती. डेव्हिड हेडली हा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याने त्याला शिकागोच्या न्यायालयाने 35 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
भारताने 10 जून 2020 रोजी तक्रार दाखल केली होती. तसेच तहव्वूर राणाला अटक करण्याची विनंतीही भारताने केली होती. त्यानुसार त्याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकन प्रशासनाने राणाला भारतात पाठवण्यास पाठिंबा देत मान्यता दिली. भारत आणि अमेरिकेत दरम्यान प्रत्यापण करार आहे. त्या कराराअंतर्गत तहाव्वूर राण्याच्या प्रत्याप्रणाला मंजुरी मिळाली आहे. आता, आरोपपत्र दाखल झाल्याने त्याचे लवकरच भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.
तहव्वूर राणा हा मूळचा पाकिस्तानी आहे. पाकिस्तानी लष्करात असताना त्याने डॉक्टर म्हणून सेवा दिली आहे. पाकिस्तानमध्ये राणा आणि हेडली यांची ओळख झाली होती. राणा हा 1997 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झाले आणि जून 2001 मध्ये कॅनडाचे नागरिकत्व मिळवले.
राणा आणि हेडली यांच्यावर 18 ऑक्टोबर 2009 रोजी प्रेषित मोहम्मद यांचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित करणार्या जिलँड्स-पोस्टेनच्या कार्यालयावर हल्ल्याचा कट रचल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतरच्या चौकशीदरम्यान, राणा मुंबईला गेला होता आणि ताजमहाल पॅलेस आणि इतर ठिकाणी वास्तव्यास होता. याच ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला होता.