मुंबई: ठाकरेंचे खंदे समर्थक (Suraj Chavan) सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले आहेत. कोविड काळात झालेल्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी या दोघांची चौकशी सुरू आहे. सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर यांच्या खात्यात काही रक्कम जमा झाली होती, त्याचा स्त्रोत नेमका काय आहे याची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


सुरज चव्हाण आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय तर अमोल कीर्तीकर हे शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपूत्र आहेत. हे दोघेही ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागल्याने तो ठाकरे गटासाठी धक्का असल्याचं समजलं जातंय.  


खात्यातील जमा झालेल्या पैशांची चौकशी 


दरम्यान, अमोल किर्तीकर यांच्या खात्यात 52 लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात 37 लाख रुपये जमा झाल्याचे समोर आलं आहे. गेल्या वेळी झालेल्या चौकशी दरम्यान या दोघांनाही खात्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत विचारणा करण्यात आली. चौकशीत या दोघांनी आपण,  फोर्सवन या कंपनीचे कर्मचारी असल्याने त्यांना पगार म्हणून हे पैसे मिळाले असल्याचे सांगितले. दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत असल्याचा जबाबत उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे. 


सूरज चव्हाण आणि अमोल किर्तीकर या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स देऊन गेल्या काही दिवसात त्यांची चौकशी करत जबाब नोंदवला आहे. आता त्यांना पुन्हा कागदपत्रासोबत हजर राहण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आलेले आहेत. 


खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय? 


मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे. 


खिचडी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाख


मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. कथित बॉडी बॅग प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातही आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनिल बाळा कदम, तत्कालीन सहआयुक्त, नियोजन, बीएमसी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला. 


ही बातमी वाचा: