अदनान हा क्रॉफर्ड मार्केटमध्ये रहायला असून रोज मुंबई सेंट्रलमधील जिममध्ये जात असतो. असाच 7 जुलैला तो जिमला गेला. नेहमीप्रमाणे तो वेट लिफ्टिंग करू लागला, पण अचानक वेट लिफ्टिंग करत असताना खाली कोसळला. यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याला कार्डियाक अरेस्ट आल्याचं उपचारादरम्यान समोर आलं. शिवाय ऑक्सिजनचा लवकर पुरवठा न झाल्यामुळे त्याचे ब्रेन हॅमरेज झाले.
जिममध्ये कार्डियाक अरेस्टचं कारण काय?
जिममध्ये अशा घटना खूप वेळा पाहायला मिळतात. याचं मुख्य कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, त्यामध्ये आपले रोजचे जेवण आणि त्यामध्येही तुम्ही काय खाता हे महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर सांगतात. किती वेळ झोप घेता आणि त्यातही महत्त्वाचं की तुम्ही ओव्हर एक्सरसाईझ करत असाल आणि तुमच्या बॉडीचे एक्स्ट्रा एक्सरशन होत असेल तर अशा प्रकारचा कार्डियाक अरेस्ट कोणत्याही वयात येऊ शकतो. त्यामुळे जिम करताना ट्रेनरचा सल्ला घ्यावा.
कार्डियाक अरेस्ट आल्यास काय कराल?
समजा असा कार्डियाक अरेस्ट कोणाला आलाच तर लगेच त्या व्यक्तीला खाली झोपवून त्याला कृत्रिम श्वास द्यावा, म्हणजे ऑक्सिजन त्या व्यक्तीला मिळेल आणि ब्रेन हॅमरेज होणार नाही. जे अदनानच्या केसमध्ये झाले आणि लवकरात लवकर वैद्यकीय मदत घ्यावी, असा सल्ला हार्ट सर्जन देतात.
कार्डियाक अरेस्ट हा अनुवंशिकही आहे. अनेकांना आपली मेडिकल हिस्ट्री माहिती नसते आणि अशा घटना घडतात, असंही डॉक्टर सांगतात.
व्यक्तीचे जीवनमान महत्वाचे आहे, त्याचे खाणे, झोप, काम या सर्व गोष्टी कार्डियाक अरेस्टला कारणीभूत ठरतात.
जिममध्ये लवकर वजन वाढवण्यासाठी, स्मार्ट होण्यासाठी मुले जिम लावतात. पण आपली बॉडी ते पेलू शकते का ते त्याचाही विचार करण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
व्हिडीओ :