मुंबई : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज (रविवार) 22 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात य़ेणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवास करू इच्छिणाऱ्यांचा पुन्हा एकदा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी सव्वादहा ते दुपारी सव्वा तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे मेल एक्स्प्रेससह धिम्या लोकल 30 मिनिटं उशिराने धावतील.
मध्य रेल्वे
पश्चिम रेल्वेवर सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या काळात बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.
हार्बर रेल्वे
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.00 ते संध्याकाळी 4.45 लोकल वाहतूक बंद राहणार आहे. तसेच या काळात पनवेल ते कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील.
दिवा स्थानकात विशेष ब्लॉक
दिवा स्थानकात पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शनिवारी रात्री 10.30 ते रविवारी सकाळी 4.15 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला.