ट्रेन क्रमांक 9007 मुंबई सेंट्रल-थिविम- मुंबई सेंट्रल या पश्चिम रेल्वेच्या गणपती विशेष ट्रेनचे आरक्षण 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता खुले होणार होते. मात्र इंटरनेटच्या माध्यमाने सकाळी 7 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास तिकिट विक्री सुरु झाली. अवघ्या काही मिनिटांच्या अंतरातच एक्स्प्रेसमधील तीन दिवसांची 135 तिकीट बुक झाली. त्यामुळे इतर प्रवासी संभ्रमात पडले. ही बाब लक्षात आल्यानंतर मध्य रेल्वेकड़ून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले.
डेटा सुपरिटेंडेंट पदावरील एका कर्मचाऱ्याने 20 जुलै 2018 ऐवजी 20 जुलै 2017 तारीख टाकल्याने हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले. त्यावर आता योग्य ती कारवाई देखील करण्यात येणार आहे. मात्र हा प्रकार गंभीर आहे. यामध्ये आउटडेटेड तंत्रज्ञान अजूनही रेल्वे वापरत असलयचे समोर आले आहे. तर बुक झालेल्या तिकीट रद्द करण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितली आहे.