2016 Maratha Morcha Bike Rally: मुंबईमध्ये 2016 मध्ये काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज या खटल्याचा निकाला लागला आहे. सबळ पुराव्याअभावी गिरगाव कोर्टाने सर्व नेत्यांची निर्दोष मुक्तता केली. यामध्ये आशिष शेलार, भाई जगताप, भरत गोगावले, विनोद घोसाळकर, राजन घाग, वीरेंद्र पवार या नेत्यांचा समावेश होता. 


2016 मध्ये काढलेल्या मुंबईतील मराठा आरक्षणासाठीच्या बाईक रॅलीमध्ये सर्वपक्षीय नेत्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 2016 ला मराठा आरक्षणासाठी बाईक रॅलीचं आयोजनात सहभागी सर्वपक्षीय 6 नेत्यांवर गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याचा आज लागला निकाल लागला आहे. आशिष शेलार, भाई जगताप, भरत गोगावले, विनोद घोसाळकर, राजन घाग, वीरेंद्र पवार हे नेते आरोपी होते. या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. 


विना परवाना बाईक रॅली, जमावबंदी उल्लंघन, वाहतुकीस अडथळा यासारखे आरोप नेत्यांवर करण्यात आले होते. पण सबळ पुराव्याअभावी सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव कोर्टानं आज यासंदर्भातील निकाल दिला. 


विरेंद्र पवार बाईट काय म्हणाले?
6 वर्षांपूर्वी मराठा समाजासाठी बाईक रॅली मुंबईकरांनी काढली होती. चेंबूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पर्यंत रॅली होती. कुठलाही अनुचित प्रकार न घडता ही रॅली निघाली होती. त्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. कोणतीही चूक किंवा आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, त्यामुळे  सर्व आयोजकांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे.  आशिष शेलार, भरतशेठ गोगावले, भाई जगताप, विनोद घोसाळकर, राजन घाग, विरेंद्र पवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे  समन्वयक विरेंद्र पवार म्हणाले.