Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला तारीख पे तारीख सुरुच आहे. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत पुढील तारीख 14 फेब्रुवारी मिळाली आहे. न्यायालयात चालढकल सुरु असल्याने राज्यातील नेत्यांमध्ये  संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जज साहब तारीख तो मिल रही है, पर इन्साफ नही मिल रहा, अशी परिस्थिती झाल्याची प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आता सुनावणी 14 फेब्रुवारीला सुरू होत असल्याने संजय राऊत यांचे भाकीत खोटे ठरणार असल्याची प्रतिक्रिया दिली.


Maharashra Political Crises : जज साहब तारीख तो मिल रही है पर इंन्साफ नही मिल रहा


अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले की, जज साहब तारीख तो मिल रही है पर इंन्साफ नही मिल रहा, तारीख पर तारीख अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. सर्वोच्च न्यायालात हा विषय आहे. आयोग आता नेमकं कशाला हात घालतं पाहावं लागेल. कोर्टात काही निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख काही ठरणार नाही. दानवे पुढे म्हणाले की, एका महापालिकेच्या निवडणुकीसाठी देशाच्या पंतप्रधांनाना यावे लागते. यावरून येथील नेतृत्व महाराष्ट्रात किती मोठं आहे हे सिद्ध होतं. हा शिवसेनेचा विजय आहे हे मानावं लागेल.


Maharashtra Political Crises : संजय राऊतांचे भाकीत खोटं ठरेल 


शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सत्तासंघर्षावरील सुनावणीला पुढील तारीख मिळाल्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, आता सुनावणी 14 फेब्रुवारीला सुरू होत असल्याने संजय राऊत यांचे भाकीत खोटे ठरणार आहे. न्यायालयीन प्रक्रिया असल्याने मी यावर फार काही बोलणार नाही.


Maharashtra Political Crises : सगळं प्रेमानं होईल


दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, आमचं राज्यघटनेवर प्रेम आहे, सत्तासंघर्षावर घटनापीठ सलग सुनावणी घेणार आहे. आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला निश्चित झाल्यानंतर शिवसेना संजय राऊत यांनी मिश्कील भाषेत टिप्पणी केली. घटनेवर आमचं प्रेम आहे, घटनापीठ सलग सुनावणी घेईल,14 फेब्रुवारी व्हलेंटाईन डे प्रेमाचा दिवस आहे, सगळं प्रेमानं होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या