एक्स्प्लोर
1993 मुंबई स्फोट : अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी? आज निकाल

मुंबई : मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी केस बी म्हणजे 93 बॉम्बस्फोटातील शेवटच्या खटल्यातील सात आरोपी दोषी आहेत की नाही, याबाबत विशेष टाडा न्यायालाय आज आपला निकाल देणार आहे. 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून ते दोषी आहेत की नाही, हे विशेष टाडा न्यायालय आज स्पष्ट करणार आहे. साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत. दुसरीकडे कोर्टाने अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. संजय दत्त ही शिक्षा भोगून आता बाहेर आला आहे. संबंधित बातम्या
अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी? 29 मे रोजी निकाल
अबू सालेम असलेल्या तळोजा जेलमध्ये कैदी-पोलिसांची मैफील
कबूल है, मी निकाहसाठी तयार; डॉन अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढणार
Before You Go
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















