एक्स्प्लोर

मुंबईतील 1993 च्या स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू

मुंबई :  मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री त्याला छातीत दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज त्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणारा दोषी आरोपी मुस्तफा डोसाला काल रात्री अचानक छातीत दुखू लागलं होतं. त्यामुळे काल रात्री 1 वाजता त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात त्याच्यावर तीन तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं. अनियंत्रित अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पण आज त्याचा मृत्यू झाला. मुस्तफा डोसासारख्या खतरनाक गुंडाची तब्येत बिघडल्यामुळे काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली होती. जेल अधीक्षकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच जे. जे. रुग्णालयात हजेरी लावली. मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी दोषी 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुस्तफा डोसाला विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी डोसाला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे. न्यायालय दोषींना काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. कोण होता मुस्तफा डोसा?
  • मुस्तफा डोसा हा 1993 च्या साखळी स्फोटातील महत्त्वाचा आरोपी.
  • दाऊद आणि टायगर मेमन यांना स्फोट घडवण्यासाठी मदत
  • मुंबई स्फोट घडवण्यासाठी ज्या बैठका झाल्या, त्या डोसानेच आयोजित केल्या होत्या.
  • डोसाने शस्त्रास्त्र प्रशिक्षणासाठी भारतातून काही जणांना पाकिस्तानात पाठवलं होतं.
  • डोसानेच एके-47,एके-56 रायफल्स आणि स्फोटकांचा पहिला साठा रायगड जवळच्या दिघीबंदरात पाठवला होता.
  • डोसाला सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता याने 1995 साली दिलेल्या जबाबावरून या स्फोटाचा आरोपी बनवण्यात आलं.
  • त्याला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 20 मार्च 2003 साली अटक करण्यात आली होती.
संबंधित बातम्या मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष रमजाननिमित्त मुस्तफा डोसाला हवेत नवे कपडे आणि मिठाई

अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी? 29 मे रोजी निकाल

अबू सालेम असलेल्या तळोजा जेलमध्ये कैदी-पोलिसांची मैफील

कबूल है, मी निकाहसाठी तयार; डॉन अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढणार

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
डोनाल्ड ट्रम्प वर्षभर मला द्या, मला द्या करत बसले; अखेर, भारतीय वंशाच्या नवी पिल्लईंना 'शांततेचा' नोबेल जाहीर
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा
Maharashtra Live News Updates: इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन करण्याची घोषणा

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget