एक्स्प्लोर
Advertisement
चौथ्या मजल्यावरुन पडूनही चिमुरडा सुखरुप
देवनारच्या जय गोपी कृष्णा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. काल सकाळी पावणे नऊच्या सुमारास अथर्व घराच्या बाहेर खेळत असताना खिडकीतून खाली कोसळला. परंतु झाडाच्या फांद्यांना अडकत गेल्याने त्याचा वेग कमी झाला. या घटनेत अथर्वला केवळ खरचटले आहे. सध्या दक्षता म्हणून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात ठेवले आहे.
मुंबई : 'देव तारी त्याला कोण मारी'ही प्रचिती पुन्हा मुंबईतल्या एका घटनेने आली आहे. 15 महिन्याचा चिमुरडा चौथ्या मजल्यावरुन पडूनदेखील सुखरुप असल्याची घटना देवनारमध्ये घडली आहे. अथर्व बरकडे असे त्याचे नाव आहे.
देवनारच्या जय गोपी कृष्णा अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. काल सकाळी पावणे नऊच्या सुमारास अथर्व घराच्या बाहेर खेळत असताना खिडकीतून खाली कोसळला. परंतु झाडाच्या फांद्यांना अडकत गेल्याने त्याचा वेग कमी झाला. या घटनेत अथर्वला केवळ खरचटले आहे. सध्या दक्षता म्हणून डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात ठेवले आहे.
देवनार येथील जय गोपी कृष्णा सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर बरकडे कुटुंब राहते. काल सकाळी पावणे नऊ वाजताच्या दरम्यान याच कुटुंबातील 15 महिन्याचा अथर्व खेळत खेळत घराच्या खिडकीजवळ गेला आणि चौथ्या मजल्यावरून त्या खिडकीतून थेट खाली कोसळला. इथे असलेल्या झाडांच्या फांद्यांना अडकत तो खाली गेल्याने त्याचा वेग कमी झाला.
अथर्व खाली पडल्याचे जेव्हा त्याच्या वडिलांनी पाहिले तेव्हा सगळ्या कुटुंबाने इमारतीच्या खाली धाव घेतली. त्या ठिकाणी अथर्वला थोड्या फार खरचटलेल्या अवस्थेत त्यांनी पाहिले आणि ताबडतोब फोर्टीस रुग्णालय गाठले. चौथ्या माळ्यावरून पडून देखील अथर्वला कोणतीही मोठी जखम झाली नाही. सध्या त्याला दक्षता म्हणून डॉक्टरांनी रुग्णालयात ठेवले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement