एक्स्प्लोर

वाशी खाडी पूल उभारण्यासाठी 137 झाडांवर कुऱ्हाड

वाशी खाडी पुलाच्या उभारणीसाठी खाडी परिसरातील 137 झाडांवर कुऱ्हाड चालणार आहे. मात्र, प्रत्यक्ष 26 च झाडे तोडली जाणार असून उर्वरित 101 झाडांना पुनर्रोपित करणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

मुंबई : महानगर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एमएमआरडीए)च्या या प्रस्तावाला नुकतीच परवानगी दिली आहे. या प्रस्तावात वाशी पुलाच्या टोलनाक्याजवळ प्रस्तावित असलेल्या निर्माणाधीन तिसऱ्या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 137 झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. दरम्यान, प्रत्यक्ष 26 झाडे तोडण्यात येणार असून 101 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. वाशी पुलाजवळील तिसऱ्या पुलामुळे सध्याच्या वाशी टोलनाक्यावरील होणारी वाहतूक कोंडीही फुटण्याची शक्यता असून या पुलामुळे मुंबई ते पनवेल दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार आहे. सध्या वाशी खाडीवर दोन पुल सुरू आहेत. यातील जुन्या पुलावरून केवळ लहान वाहनांचा प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर नव्या पुलावरुन लहान आणि अवजड अशा दोन्ही वाहनांची वाहतूक सुरू असते. त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तिसऱ्या पुलाच्या उभारणीमुळे वाहतूक कोंडी फुटेल असा अंदाज आहे. एमएमआरडीच्या मते, वाशी खाडीच्या दोन्ही बाजूला सुमारे 442 वृक्ष असून, यातील 281 झाडांवर कुऱ्हाड चालविण्याची परवानी नवी मुंबई महापालिकेने यापूर्वीच दिली होती. परंतु, मानखुर्द परिसरात आणखी 137 झाडे कापण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव प्रलंबित होता. ही परवानगी आता देण्यात आली आहे. प्रत्यक्षात 26 झाडे कापली जाणार - 137 झाडांपैकी प्रत्यक्षात 26 झाडे कापली जाणार असून, 101 झाडे पुनर्रोपित केली जाणार आहेत. तर 10 झाडांवर कुऱ्हाड चालविण्यापासून त्यांचा बचाव केल्याचेही एमएमआरडीएच्या वतीने स्पष्ट केले. कापण्यात येणाऱ्या झाडांमध्ये जास्तीत जास्त गुलमोहर आणि बोराची झाडे आहेत. त्यामुळे ही झाडे कापल्यानंतर खोड, बुंधा आणि फांद्या कापून त्यांना लगेचच अन्यत्र हलविले जाणार आहे. तीस दिवसांच्या आत हे काम पूर्ण केले जाईल असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. मेट्रो कारशेडसाठी आरे जंगलातील अडीच हजारच्यावर झाडे तोडल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ठाकरे सरकार सत्येत आल्यानंतर त्यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यामुळेच वाशी खाडीतील पुलासाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांवरुन वाद होऊ नये म्हणून पालिकेने तयारी केली आहे. Nitin Gadkari | विकासकामासाठी काही वेळा वृक्षतोड अनिवार्य : नितीन गडकरी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget