एक्स्प्लोर

ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात मेळघाटात 12 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू

सध्याच्या ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भाग मेळघाटात 12 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

मुंबई : राज्यात कुपोषणाची समस्या किती गंभीर आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आलाय. सध्याच्या ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात अमरावती जिल्ह्यातील आदिवासी भाग मेळघाटात 12 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची माहिती याचिकाकर्ते बंडू साने यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली. यंदाच्या सप्टेंबर महिन्यात एकूण 72 मुलांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची माहिती गेल्या सुनावणीला हायकोर्टासमोर मांडण्यात आली होती. आदिवासी विभागात प्रत्यक्षात जाऊन पाहणी केल्यानंतर अधिकारी मुख्य समितीला काय अहवाल देतात? याचा तपशील पुढील सुनावणीला सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत. गेल्या सुनावणीला कोर्टाच्या निर्देशांनुसार स्थापन करण्यात आलेल्या कोअर कमिटीतील किती जण प्रत्यक्षात जाऊन आदिवासी विभागांत पाहाणी करतात असा सवाल हायकोर्टाने विचारला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभागाचा अधिकारी हे प्रत्यक्षात जाऊन पाहाणी करून त्याचा अहवाल मुख्य समितीला वेळोवेळी देत असतात, अशी माहिती हायकोर्टाला देण्यात आली. मात्र ऑगस्ट महिन्यानंतर ही पाहणी झालेली नाही, तसेच 18 ऑगस्टला कोअर कमिटीची शेवटची बैठक झाली होती, अशी कबुली राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात देण्यात आली. कुपोषणासंदर्भातील विविध याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरूय. मेळघाटात सध्या कुपोषणाचा सामना करण्यासाठी नेमके किती डॉक्टर्स आणि नेमकी काय वैद्यकीय सेवा हवी आहे याचा अभ्यास का करण्यात आला नाही? असा सवाल विचारत हायकोर्टाने राज्य सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली होती. मेळघाटात किती पॅथॉलॉजी लॅब्स आहेत?, किती वेळात त्याला अहवाल मिळतो?, तिथे काम करणाऱ्या डॉक्टरांना कोणत्या विशेष सवलती दिल्या जातात?, त्यांच्या राहण्याची नीट व्यवस्था आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच मंगळवारी हायकोर्टाने राज्य सरकारवर केली. कुपोषण प्रश्न हा 40 टक्के सामाजिक आणि 60 टक्के आर्थिक प्रश्नांशी निगडीत असल्याचं अनेक अहवालांवरुन समोर आलं आहे. तेव्हा त्याही गोष्टी तुम्ही गंभीरतेने घ्या, असंही कोर्टाने सरकारला सुनावलं. या प्रकरणी युनिसेफचा अहवाल महत्त्वाचा असून त्याचाही अभ्यास करा, अशी सूचना हायकोर्टाने राज्य सरकारला केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला

Embed widget