नवी मुंबई : पाकिस्तान मुर्दाबाद बोलल्यावर तुमच्या बिर्याणीच्या बीलावर 10 टक्के मिळाली तर? होय, हे खरं आहे. सध्या सोशल मीडियावर एका हॉटेलमधील व्हीडिओ वायरल होतोय. यात पाकिस्तान मुर्दाबाद बोलल्यावर 10 टक्के सूट मिळत असल्याचं दिसतं आहे.

काय आहे व्हीडिओ मागची सत्यता?

काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 पेक्षा अधिक भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट पसरली आहे. विविध मार्गाने भारतीय नागरिक आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली देत आहेत व पाकिस्तान विरोधात आपला निषेध व्यक्त करतायत.

VIDEO | पाकिस्तान मुर्दाबाद बोला 10 टक्के सूट मिळवा | वायरल चेक | एबीपी माझा



याच पार्श्वभूमीवर खारघरमधील हॉटेल व्यावसायिक सय्यद खान यांनी आपल्या ‘लकी तवा हॉटेल’वर येणाऱ्या ग्राहकांसाठी प्रत्येक ऑर्डर वर 10 टक्के सूट देण्याची ऑफर दिली आहे.  यासाठी ग्राहकांना पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत. ग्राहकांनी देखील या आगळ्यावेगळ्या ऑफरचे स्वागत केले आहे. तर येथे येणारा प्रत्येक ग्राहक हा आपला पाकिस्तान विरोधातील रोष याठिकाणी जाहीर करत असून पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आहेत. सध्या हॉटेलची ही ऑफर सर्वत्र वाऱ्यासारखी पसरत असून ग्राहक देखील या ऑफर चा फायदा घेण्यासाठी गर्दी करीत आहेत.

यावेळी हॉटेल व्यावसायिक सय्यद खान यांनी भारतातील मुस्लिम हे भारतासोबत असून पाकिस्तान विरोधात आहेत. तसेच लष्करात जाऊन आम्ही काम करू शकत नाहीत म्हणून पाकिस्तानचा निषेध आम्ही या मार्गाने करत असल्याचे ते म्हणाले. लोकांकडून पाकिस्तानचा विरोध करण्यासाठी पसंती दिल्याने अजून एक आठवडा हा उपक्रम राबविला जाणार आहे.