Maharashtra Weather Update : राज्यभरातील बहुतांश भागात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा आपली हजेरी लावल्याचे बघायला मिळत आहे. अशातच आता मुंबई आणि मुंबई उपनगरासाठी पावसासंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईला (Mumbai)पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट (Red alert) जारी करण्यात आला आहे. सोबतच दक्षिण मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. तर नवी मुंबईतही पावसाला सुरुवात झाली आहे. (Mumbai Weather Update)

Continues below advertisement


दरम्यान, मुंबईसाठी पुढल्या तीन महत्वाचे ठरणार आहे. कारण, पुढील 3 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. परिणामी, मुंबई आणि उपनगरांत 2 तारखेपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचे चिन्ह आहे. 


रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरूच 


रायगड जिल्ह्यात वेळेत पोहोचलेला पाऊस आज 7 जून रोजी मुसळधार कोसळताना पाहायला मिळतोय. हवामान विभागाकडून सुद्धा रायगड जिल्ह्याला आज मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं अलिबाग मुरूड तालुक्यात सुद्धा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड जवळ सुद्धा रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.


मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार  


आयएमडीचे पुणे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (7 जून)  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आण  विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. तर आज (7 जून) तीव्र पावसासह ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. येत्या काही तासात पुण्यात बारामती, दौंड, इंदापूर तसेच मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान, आज राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.पालघर, ठाणे, रत्नागिरी, पुणे, रायगड, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जालना इत्यादि जिल्ह्यांचा समावेश आहे.


पिंपरी चिंचवड शहरात दमदार पाऊस, हिंजवडी आयटी पार्क झाला वॉटर पार्क 


अवघ्या काही मिनिटे आलेल्या दमदार पावसामुळे हिंजवडी परिसरातील रस्ते पाण्याने तुंबले आहेत. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी वाहन देखील वाहून गेले आहेत. पावसाळ्यापूर्वी हिंजवडी परिसरामध्ये ड्रेनेज लाईन आणि नालेसफाई योग्य पद्धतीने न झाल्याने आज आयटी पार्क हिंजवडी वाटर पार्क हिंजवडी झाल्याची वेळ ओढवली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या