Maharashtra Weather Update: राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्यास सुरुवात झालीय. मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडाभरानंतर पावसानं उघडीप घेतली होती. परंतू, आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला पोषक स्थिती निर्माण झालीय. आजपासून पुढील 4-5 दिवस पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, साताऱ्यासह मराठवाडा,विदर्भाला पाऊस झोडपणार आहे. मध्य महाराष्ट्रात आज ढगांच्या गडगडाटासह वादळी पावसाचा अंदाज IMD ने वर्तवलाय.. (Rain Update)

Continues below advertisement

आज सकाळपासूनच मुंबईसह पुण्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे व आसपासच्या भागात गेल्या 24 तासांत हलका ते मध्यम पावसाची हजेरी होती. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक भागांत ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. येत्या चार दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय.

हवामान विभागाचा अंदाज काय?

नैऋत्य मोसमी पाऊस आता दक्षिणेच्या बहुतांश भागात दाखल झाला आहे. उत्तरेकडील राज्यांच्या दिशेने मान्सूनचा प्रवास सुरु असून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा जोर असेल. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार,चक्राकार वाऱ्यांचा ओघ सध्या राजस्थान आणि आजूबाजूच्या परिसरात सक्रीय आहे. कोकण, मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक जिल्ह्यांमध्ये काल दिवसभरात मुसळधार पावसाची नोंद झाली. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आण  विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. आयएमडीचे पुणे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (7 जून) तीव्र पावसासह ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. येत्या तीन ते चार तासात पुण्यात बारामती, दौंड, इंदापूर तसेच मुंबई, ठाणे, रायगडमध्ये पावसाची शक्यता आहे.

Continues below advertisement

कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?

आज राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.पालघर, ठाणे, रत्नागिरी, पुणे, रायगड, नाशिक, जळगाव, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बीड, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, धुळे, जालना

13 जून ते 18 जूनच्या दरम्यान अतिमुसळधार पाऊस पडणार

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये 7, 8, 9 जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण त्याच्यानंतर 13 जून ते 18 जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल. म्हणजे ओढे,नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे. 

हेही वाचा

कुंभार्ली घाटात संरक्षण भिंत कोसळली, रेलिंगही निखळलं; कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रस्त्यावर केवळ दगड लावून बोळवण