Mumbai Local Train Accident मुंबई : राजधानी मुंबईतील लोकलचा (Local) प्रवास म्हणजे जीव मुठीत धरुन जगणं होय. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दररोज या लोकलने प्रवास करतात. अशातच या गर्दीमध्ये अनेक अपघात देखील घडत असतात. दरम्यान, मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी असाच एक अपघात होऊन 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडले होते. यापैकी चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दोन प्रवासी गंभीररित्या जखमी आहेत. उर्वरित प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Continues below advertisement


दरम्यान, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असताना या अपघाताचा घटनाक्रम प्रत्यक्षदर्शीने सांगितला आहे. ट्रेनमधून 13 जण पडल्यावर प्रवाशांनी चेन खेचली, पण लोकल थांबलीच नाही. किंबहुना रुग्णवाहिकेअभावी जखमींना टेम्पोतून आणण्यात आलं. तातडीची मदतच मिळाली नाही. अन्यथा, अनेकांचे जीव वाचले असते, अशी खंत  मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील एक प्रत्यक्षदर्शी प्रवासी दीपक शिरसाठ यांनी बोलताना व्यक्त केली आहे. 


इमर्जन्सीची चेन खेचली, मात्र लोकल थांबलीच नाही


कसारा ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ही लोकल ठाण्याच्या दिशेने जात असताना त्याचवेळी सीएसएमटी ते कसारा ही लोकल आली. गर्दीने तुडुंब भरलेल्या या लोकलमध्ये काही लोक अगदी दारात लटकले होते. त्यातील लोकलमधील एका प्रवाशाची बॅग बाजूच्या लोकलमधील प्रवाशांना लागली. त्यामुळे दोन्ही लोकलमधील प्रवासी पडले. त्यात आमच्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधील तीन ते चार प्रवासी खाली कोसळले. हा प्रकार कळताच काहींनी इमर्जन्सीची चेन खेचली, मात्र लोकल थांबलीच नाही. ती थेट ठाण्याला थांबली. त्यानंतर दुसऱ्या लोकलने पुन्हा मुंब्राकडे आलो. तोपर्यंत तातडीची मदतच मिळाली नाही. अन्यथा, अनेकांचे जीव वाचले असते, अशी माहिती मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील एक प्रत्यक्षदर्शी प्रवासी दीपक शिरसाठ दिली आहे.


अपघातानंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर RPF, GRPF आणि लोकल पोलीस तैनात


मुंब्रा स्टेशन येथे झालेल्या रेल्वे अपघातानंतर प्लॅटफॉर्म नंबर चार वर  आरपीएफ(RPF), जीआरपीएफ(GRPF) आणि लोकल पोलीस तैनात आहेत. काल दोन रुळांमधील अंतर रेल्वे इंजिनियर्स मोजण्यात आलं. शिवाय प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार अप डाऊन मार्गाने ये-जा करणाऱ्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या वळणावरून धिम्या गतीने पुढे मार्गस्थ होत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या