Housefull 5 Box Office Collection Day 4: 6 जून रोजी प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात अक्षय कुमार (Akshay Kumar), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा 'हाऊसफुल 5' (Housefull 5 Movie) हा चित्रपट खूप कमाई करतोय. आता चित्रपटानं पुन्हा एकदा दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. असं असलं तरीसुद्धा काल चित्रपटाचा पहिला मंडे होता. 'हाऊसफुल 5' या कॉमेडी सिनेमा विकडेच्या परिक्षेत पास होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच पहिल्या सोमवारी सिनेमानं किती कलेक्शन (Housefull 5 Box Office Collection) केलं? ते सविस्तर पाहुयात... 

'हाऊसफुल 5'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती? 

'हाऊसफुल 5'च्या प्रोडक्शन हाऊसनं त्यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर पहिल्या 3 दिवसांतील चित्रपटाच्या कमाईशी संबंधित आकडेवारी पोस्ट केली आहे. त्यानुसार, चित्रपटानं पहिल्या दिवशी 24.35 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 32.38 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 35.10 कोटी रुपये कमावले आहेत, ज्यामुळे एकूण आठवड्याच्या शेवटी 91.83 कोटी रुपये कलेक्शन झालं आहे. 

आता चित्रपटाच्या कमाईशी संबंधित चौथ्या दिवसाच्या सुरुवातीचे आकडेही समोर आले आहेत. बॉक्स ऑफिसवरील अपडेटेड डेटा ठेवणाऱ्या सॅकनिल्क या वेबसाईटनुसार, 'हाऊसफुल 5'नं रात्री 10:40 वाजेपर्यंत 13.50 कोटी रुपये कमावले आहेत आणि चित्रपटाचा एकूण कलेक्शन 105.33 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. त्यात बदल होऊ शकतात.

'हाऊसफुल 5'नं चौथ्या दिवशी रचला विक्रमांचा डोंगर 

'हाऊसफुल 5'नं या वर्षी प्रदर्शित झालेल्या 14 चित्रपटांच्या लाईफटाईम कलेक्शनचा टप्पा अवघ्या दोनच दिवसांत ओलांडला होता. तिसऱ्या दिवशी म्हणजे काल, या चित्रपटानं 'भूल चुक माफ' आणि 'जाट'च्या लाईफटाईम कलेक्शनलाही मागे टाकलंय. आता आज, चित्रपटाच्या लाईफटाईम कलेक्शनचे सुरुवातीचे आकडे समोर येताच, चित्रपटानं 'केसरी 2'च्या 92.53 कोटी रुपयांचा आकडाही ओलांडला आहे.

चित्रपटानं पहिला मंडे यशस्वीरित्या गाजवला आहे आणि चांगली कमाई करत आहे, लवकरच 'हाऊसफुल 5' सलमान खानच्या 'सिकंदर' च्या लाईफटाईम कलेक्शनचाही (110.1 कोटी रुपये) टप्पा ओलांडेल अशी शक्यता आहे. 

'हाऊसफुल 5'चं लाईफटाईम कलेक्शन किती? 

SACNILC नुसार, 'हाऊसफुल 5'नं फक्त तीनच दिवसांत 142.40 कोटी रुपये कमावले आहेत. आता जर आपण आजच्या देशांतर्गत कलेक्शनचा डेटा त्यात जोडला तर चित्रपट 155.90 कोटी रुपयांचा आकडा ओलांडतो. तरुण मनसुखानी दिग्दर्शित हा चित्रपट 225 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. याचा अर्थ चित्रपटानं त्याच्या बजेटच्या सुमारे 67 टक्के रक्कम आधीच वसूल केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

OTT Marathi Web Series Andhar Maya: 'फायनल डेस्टिनेशन'ची बाप, सस्पेन्स तर खतरनाक, ओटीटी गाजवतेय 'ही' मराठी हॉरर सीरीज; कुठे पाहाल?