Mumbai -Goa Highway Traffic Change : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून (Mumbai) कोकणात जाणाऱ्या कोकणकर चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सवासाठी (Ganesh Utsav 2025) गावी जात आलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा व्यत्यय न येता हा प्रवास सुखकर आणि सुखरूप व्हावा याकरिता वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. येत्या 23 ऑगस्टपासून मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.  कोकणातील गणेशभक्तांचा गावचा प्रवास सुखकर होण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून त्या अनुषंगाने या महामार्गावर 16 टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांना 23 ऑगस्टपासून बंदी असणार आहे.

Continues below advertisement


असे असणार अवजड वाहनांना महामार्गावरील बंदीचे वेळापत्रक


मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 23 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 29 ऑगस्टला रात्री 12 वाजेपर्यंत, तर 2 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून 4 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत, तसेच 6 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबरला रात्री 8 वाजेपर्यंत हे बंदीचे आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.


गणपतीपूर्वी मुंबई-गोवा महामार्ग सुस्थितीत होण्याची मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही


मुंबईतील कोकणकर आणि चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी जात असतात. गावी जात असताना या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा याकरिता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. शिवेंद्रसिंह राजे भोसले हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते म्हणाले कि, मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्ग गणपती सनापूर्वी सुस्थितीत होणार असल्याची ग्वाही दिली.


धावत्या दौऱ्यामुळे महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह


मात्र, मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा हा धावता दौरा असल्याचे सांगत मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम येथील घाटाची पाहणी न करताच शिवेंद्रराजे भोसले यांनी दौरा आटपला. परशुराम घाटात वारंवार घडणाऱ्या अपघात आणि दुरावस्थेकडे मंत्र्यांनी पाठ फिरवली, अशी टीका आणि चर्चा आता होऊ लागली आहे. रायगडनंतर थेट रत्नागिरीमधील महामार्गाची पाहणी करताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी टॉप गिअ टाकला. त्यामुळे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या या धावत्या दौऱ्यामुळे महामार्गाच्या पाहणी दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांनी टीका केली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या