Ganesh Utsav 2025 मुंबई : गणेशोत्सवाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना मुंबईतील मंडप उभारणीच्या कामातील अडथळा अद्याप मिटलेला नाही. यंदा गणेश मंडळांनी (Mumbai Ganesh Utsav 2025) रस्त्यावर जर मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावली नुसार 15 हजार रुपये दंड पालिकेकडून आकारण्यात येणार आहे. मात्र या पूर्वी हा दंड फक्त 2 हजार रुपये होता. म्हणजेच यंदा हा दंड तब्बल साडेसात पट वाढवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ही कारवाई 'अन्यायकारक' असल्याचं मत व्यक्त केलंय. तर दुसरीकडे याच मुद्दयांवर बोट ठेवत सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गणेशोत्सव मंडळांना आवहन करत मंडपासाठी खणलेल्या एकाही खड्ड्याचे पैसे देऊ नका, असा सल्ला दिला आहे.
वांद्राच्या (Mumbai) रंगशारदा येथे मुंबईतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आमदार अनिल परब, सुनील प्रभू आणि महेश सावंत आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सदस्य देखील बैठकीला उपस्थित होते.
तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्यासाठी कोणीही पैसे भरू नका- उद्धव ठाकरे
मंडपाला एवढी बंधन घातली तर मंडप बांधायचे तरी कुठे? आत्ता सगळीकडे टॉवर उभे रहात आहेत, अशावेळी उत्सव कुठे साजरे करायचे? सरकारने गणेशोत्सवासाठी मोफत एसटी सोडून गणेशभक्तांची सोय केली. पण मुंबई-गोवा महामार्गावर इतके खड्डे पडले आहेत की त्यामुळे हाडे खिळखिळी होणार आहेत. मुंबई मंडपासाठी रस्ता खोदला तर दंड आकारला जाणार आहे. त्याच नियमानुसार रस्त्यांवरील खड्ड्यांचे काय? या मार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवत नाही तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्यासाठी कोणीही पैसे भरू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशमंडळांना केले.
.....पण गणपती बाप्पा बघतोय हे लक्षात ठेवा - उद्धव ठाकरे
आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवला होता, समुद्राच पाणी पिण्यापूरक करणार होतो. सरकार आता गारगाई प्रकल्प मंजूर करून समुद्राच पाणी गोड करायचं म्हणत आहेत. एकीकडे अणुप्रकल्प मजुरी द्यायची आणि पीओपीच्या नावाने शंका करायची. मुंबई-गोव्याचा रस्त्यावर खड्डे आहेत आणि इथे खड्डे केले तर 15000 दंड. एकतर मुंबई-गोवा हायवेवरील खड्ड्यांवर सरकारला दंड आकारावा, नाहीतर आम्ही खड्याचा दंड भरणार नाही. आम्ही ही बंधन सहन करणार नाही, तोडून टाकणार, हवं ते करा. आम्ही डिजेचा अतिरेक करणार नाही. कारण उत्सव जल्लोषात झाला पाहजे, पण गणपती बाप्पा बघतोय हे लक्षात ठेवा. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या