Mumbai Crime News मुंबई: दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या मरीन ड्राइव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये 60 वर्षीय महिलेचा मृतदेह (Mumbai Crime News) आढळल्याने खळबळ उडाली आहे. विनती मेहतानी असे या महिलेचे नाव असून रविवारी सदर घटना घडल्याचं समोर आली आहे. 


ट्रायडेन्ट हॉटेलच्या (Trident Hotel Mumbai) 27 व्या मजल्यावरील खोलीत विनती मेहतानी होती. हॉटेलचे कर्मचारी रुम सर्विससाठी गेल्यावर महिला दरवाजा उघडला नाही. त्यानंतर मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला असता विनती मेहतानी यांचा मृतदेह आढळला. सदर घटनेनंतर ट्रायडेन्ट हॉटेलने पोलिसांनी माहिती दिली. 


पोलिसांनी कोणती माहिती दिली?


सदर घटनेनंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, विनती मेहतानी पेडर रोडवरील चेलाराम हाऊस परिसरात राहते. मृत विनती मेहतानी हॉटेलमध्ये कधी आली होती, त्याचबरोबर इतर माहिती पोलीस घेत आहेत. मृत महिला ही आजारी असल्याची माहिती मिळाली असून संशयास्पद काही आढळून आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहे.


मरीन ड्राइव्हच्या ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, VIDEO:



संबंधित बातमी:


Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्...जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना