Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्याच घरात घुसून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सैफ (Saif Ali Khan - Kareena Kapoor Khan) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर तातडीनं उपचार करण्यात आले. सैफवर झालेला हल्ला गंभीर होता, त्याला झालेल्या जखमासुद्धा अत्यंत खोलवर होत्या. त्याच्यावर तात्काळ शस्त्रक्रियाही करण्यात आली. हल्ल्यानंतर खान कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र वेगानं फिरवली. त्यावेळी पोलिसांना सैफ राहत असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरच्या पायऱ्यांजवळ आरोपी CCTV मध्ये दिसला आणि पोलिसांनी वेगानं तपास सुरू केला. 


आरोपी सीसीटीव्हीमध्ये स्पॉट होऊनही पोलिसांना तो काही सापडत नव्हता. तब्बल तीन दिवस गुंगारा दिल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. पण, पोलिसांचा आरोपीपर्यंत पोहोचण्याचा प्रवास अगदी फिल्मी होता. आरोपीनं पोलिसांच्या नाकी नऊ केले होते. पण, हार मानतील ते मुंबई पोलीस कसले... पोलिसांनी बारीक सारीक गोष्टी हेरुन त्यांचा माग काढला आणि आरोपीपर्यंत पोहोचले.


गेटवर सिक्युरिटी नसल्यामुळे आरोपीनं अगदी सहज इमारतीत प्रवेश केला 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल तीन दिवस आरोपी पोलिसांसोबत लपंडाव खेळत होता. आरोपी मोहम्मद शहाला शोधण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. अखेर ठाण्यातील कासारवडलीच्या हिरानंदानी परिसराच्या कामगार वस्तीतून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, पोलिसांनी पकडल्यानंतर आरोपीनं सांगितलं की, त्याला ठाऊक नव्हतं की, तो कुण्या बड्या सेलिब्रिटीच्या घरात घुसतोय. गेटवर सिक्युरिटी नसल्यामुळे त्याला अगदी सहज इमारतीत प्रवेश मिळाला. त्यानंतर त्यानं घरात घुसून हल्ला केला आणि अगदी सहज तिथून पळ काढला. 


आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या पाठीवरची बॅग महत्त्वाची ठरली 


सैफच्या घरात घुसून त्याच्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीनं अगदी सहज तिथून पळ काढला. त्यानंतर सर्वात आधी जाऊन आरोपी निवांत ढाराढूर झोपला. झोप पूर्ण झाल्यावर तो उठला आणि तिथून त्यानं थेट वांद्रे स्टेशन गाठलं. त्यापूर्वी त्यानं स्वतःचे कपडे बदलले आणि तिथून दादार स्टेशन गाठलं. दादरहून तो वरळीला गेला आणि वरळीत एका माणसाशी भेट घेऊन तो तिथून ठाण्याला निघून गेला, अशी माहिती स्वतः आरोपीनं पोलीस चौकशीत दिली आहे. पकडलं जाऊ नये म्हणून आरोपीनं सर्वोतोपरी काळजी घेतली पण, पाठीवरच्या बॅगेचा मात्र त्याला विसर पडला. आरोपी ज्यावेळी सैफच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पॉट झाला होता, त्यावेळी त्याच्या पाठीवर बॅग होती. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेरलं होतं. याच बॅगेमुळे पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. पुढे सीसीटीव्ही, डम डाटा आणि  ऑनलाइन पेमेंटच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीचा माग काढण्याचा निर्णय घेतला. 


दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं आरोपी शहजादचा फोटो घेतला. त्या फोटोच्या आधारावर पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्याच्या चेहऱ्याशी साधर्म्य असलेल्या अभिलेखावरील सर्व गुन्हेगारांची पडताळणी केली. त्यानंतर पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतलं, पण अखेर पदरी निराशाच आली. हाती काहीच लागलं नाही. मग, पुन्हा वांद्रे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं.


पाहा व्हिडीओ : Saif Attacke Kidnap Jahangir : सैफचा लेक जहांगीरला ओलीस ठेऊन पैशांची मागणी करण्याचा आरोपीचा कट



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


वांद्र्यातील सेलिब्रिटींच्या घरांची रेकी, रिक्षात बसून शाहरुख, सैफ, सलमानच्या घराबाहेर...; पोलिसांनी आरोपीचा कच्चाचिठ्ठाच काढला