Reliance Industries Update: देशाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती तथा अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच एक मोठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांची रिलायन्स  इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) ही कंपनी दिग्गज निर्माते करण जोहर (Karan Johar) यांच्या धर्मा प्रोडक्शन्स (Dharma Productions) या प्रोडक्शन हाऊसमध्ये गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार करन जोहर धर्मा प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसमधील हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी अनेकांशी चर्चा केली. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे हा करार होऊ शकला नाही.  


मुकेश अंबानी धर्मा प्रोडक्शनमध्ये गुंतवणूक करणार?


धर्मा प्रोडक्शन आणि रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपन्यांत होत असलेल्या कराराबाबत इकोनॉमिक्स टाईम्स या वृत्तपत्राने सविस्तर माहिती दिली आहे. या रिपोर्टनुसार सारेगामा इंडिया लिमिटेड (SAREGAMA India Limited) ही कंपनी धर्मा प्रोडक्शन्स या प्रोडक्शन हाऊसमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सूक होती. गेल्या आठवड्यात याबाबत वृत्त आल होते. त्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड आणि धर्मा प्रोडक्शन यांच्यात लवकरच करार होणार आहे, असे म्हटले जात आहे. धर्मा प्रोडक्शनमध्ये करन जोहर यांची 90.7 टक्के मालकी आहे. तर 9.24 टक्के मालकी त्यांची आई हिरू जोहर यांची आहे. धर्मा प्रोडक्शनने आतापर्यंत अनेक प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केलेली आहे.  


रिलायन्सचा वाढता विस्तार


रिलायन्स इंडस्ट्रिज ही कंपनी दिवसेंदिवस विस्तारत चालली आहे. या कंपनीचे जिओ स्टुडिओ (Jio Studio), वायकॉम 18 स्टुडिओ (Viacom18 Studio) तसेच बालाजी टेलीफिल्म्स ( Balaji Telefilms) या कन्टेंट निर्मिती करणाऱ्या संस्थांमध्ये हिस्सेदारी आहे. जिओ स्टुडिओ ही संस्था सध्या देशातील सर्वांत मोट्या फिल्म स्टुडिओंपैकी एक आहे. जिओ स्टुडिओने निर्माण केलेल्या कलाकृतींनी 2023-24 सालात 700 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केलेले आहे. या कंपनीने नुकतेच मॅड्डॉक फिल्म्सला (Maddock Films) सोबत घेऊन स्त्री 2 (Stree 2) या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 


धर्मा प्रोडक्शनचे महसूल वाढला


गेल्या काही वर्षांत धर्मा प्रोडक्शनने अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध चित्रपटांची निर्मिती केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात धर्मा प्रोडक्शन या कंपनीचा महसूल चार पटीने वाढून 1040 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. याआधी आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हा महसूल 276 कोटी रुपये होता. महसूल वाढला असला तरी 2021-22 च्या तुलनेत 2022-23 या वर्षी कंपनीच्या नफ्यात ट झालेली आहे. 


हेही वाचा :


15 ऑक्टोबरपासून पैशांचा पडणार पाऊस? आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार


CIDCO House Lottery 2024 : सिडकोच्या घरांसाठी 75 हजारांची अनामत रक्कम, 5 पसंतीची मर्यादा; लॉटरीत भाग घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज?


महत्त्वाची बातमी! इन्शुरन्स घेत असाल तर अगोदर 'हे' वाचा, LIC ने अनेक नियमात केले मोठे बदल